Amrut Yojana : ‘अमृत’ची तऱ्हाच न्यारी, डांबरी रस्त्याची फोडाफोडी; नवीन रस्ते फोडले

New roads reconstruction in Raisoni Nagar area for amrut yojana jalgaon news
New roads reconstruction in Raisoni Nagar area for amrut yojana jalgaon newsesakal

Amrut Yojana : ‘अमृत’योजनेमुळे जळगावकर आता त्रस्त झाले आहेत. ही योजना पूर्ण होत नाही, त्यामुळे रस्तेही चांगले होत नाहीत. दुसरीकडे पाणीही मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे.

रायसोनीनगर भागात तर नागरिकांना ‘अमृत’चे कनेक्शन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात अद्यापही त्यांचे नळ कोरडेच आहेत. परंतु पाणीपट्टी मात्र लागू झाली आहे. तर रस्ते डांबरीकरण झाल्यानंतर आता ‘अमृत’च्या कामासाठी पुन्हा रस्ते फोडण्यात आले आहेत.

पाणीपुरवठ्याची ‘अमृत’योजना जळगावकरांना आता खऱ्या अर्थाने त्रासदायक ठरू लागली आहे. महापालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकार घडत आहे. (New roads reconstruction in Raisoni Nagar area for amrut yojana jalgaon news)

रायसोनीनगर भागात तर अत्यंत गंभीर स्थिती आहे. या भागातील नागरिकांची अधिकाऱ्यांनी अगदी फसवणूकच केली असल्याचे दिसून येत आहे.

या भागातील नागरिकांनी सांगितले कि, अमृत योजनेचे काम सुरू झाल्याने व आमच्याकडे कोणतेही जुने नळ कनेक्शन नसल्याने सदर अमृत योजनेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हांस १८ डिसेंबर २०२०ला अमृत योजनेचे पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन घेण्यास सांगितले व आम्हास भाऊचे उद्यान जवळील ऑफिसला पाणीपट्टी विभागातून पावती फाडून आणण्यास सांगितले.

पावती आमच्याकडे जमा केल्यानंतरच तुम्हाला अमृत योजनेचे कनेक्शन देण्यात येईल, नाहीतर अमृतचे कनेक्शन देण्यात येणार नाही असेही सांगितले. अमृत योजनेचे कनेक्शन दिल्यानंतर त्यावर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही आता अमृत योजनेचे कनेक्शन करून घ्यावे. नंतर अमृत योजनेचे कनेक्शन हवे असेल, तर ते मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले होते.

त्यानुसार आम्ही अमृत योजनेचे कनेक्शनसाठी पावती फाडून त्यांच्याकडे जमा केली व त्यांनी आमचे अमृतचे नळ कनेक्शन काढून दिले. मात्र, त्यानंतर आमच्या परिसरात रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

New roads reconstruction in Raisoni Nagar area for amrut yojana jalgaon news
Amrut Yojna Project : पिंप्राळेकर म्हणताय... ‘अमृतचे पाणी, ठिबक सिंचनावाणी’

परंतु, अमृत योजनेचे पाणी मात्र सुरू झाले नाही. तरीही आम्हाला २०२०-२१पासून घरपट्टीमध्ये पाणीपट्टी लागू करण्यात आली आहे. आमच्याकडे आजही ‘अमृत’पाणी आलेले नाही. याबाबत आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सध्या तरी ते कोणतेही उत्तर देत नाहीत.

डांबरी रस्ताच फोडला

रस्त्याचे काम झाल्यावर नळ कनेक्शनसाठी डांबरी रस्ता फोडावा लागू नये म्हणून आमच्याकडून तातडीने पैसे घेवून नळ कनेक्शन दिले. परंतु, आता रस्ता झाल्यावर चांगला डांबरी रस्ता ‘अमृत’च्या कामासाठी खोदण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता आता पूर्ण खराब झाला आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्‍न आहे. महापालिकेचे अधिकारी याबाबत लक्ष देण्यासही तयार नाहीत.

‘अमृत’योजनेबाबत जनतेची संपूर्ण फसवणूक केली जात आहे. तसेच, रस्त्याची फोडाफोडी करून जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून रायसोनीनगर भागातील नागरिकांना न्याय द्यावा. तसेच अधिकऱ्यांवर कारवाई करावी व आम्हाला ‘अमृत’चे पाणी द्यावे अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

New roads reconstruction in Raisoni Nagar area for amrut yojana jalgaon news
Jalgaon GMC News : ‘जीएमसी’तील मुदतबाह्य कीट प्रकरणी चौकशी; चारसदस्यीय समिती नियुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com