Latest Marathi News | खबरदार, गडकिल्ल्यांवर पार्ट्या कराल तर..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chalisgaon: Officials of Sahyadri Pratishthan along with Dilip Ghorpade while giving a statement to the officers of rural police station.

Jalgaon News : खबरदार, गडकिल्ल्यांवर पार्ट्या कराल तर..!

चाळीसगाव : तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्ले राजदेहरे, किल्ले कन्हेरगड, किल्ले मल्हारगड, या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला थर्टी फर्स्टला (ता.३१) पोलिस गस्त ठेवावी, तसेच या ठिकाणी दारू मटणाच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर संवर्धन कार्य करत असून, गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील तमाम गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेतील बलस्थाने असून, अनेक मावळ्यांनी त्यासाठी आपले बलिदान दिले आहे. (New year party dont celebrate in fort area police instructions Sahyadri Foundation to keep Watch Appeal to police administration to patrol Jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon News : विवाहितेने मृत्यूला कवटाळले

त्यावर अनेक समाध्या व देवी देवतांची मंदिरे आहेत म्हणून हे गडकिल्ले पवित्र तीर्थस्थानेच आहेत. तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्ले राजदेहरे, किल्ले कन्हेरगड, किल्ले मल्हारगड, या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला ३१ डिसेंबरला पोलिस गस्त ठेवावी, तसेच या ठिकाणी दारू मटणाच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारचे उपद्रव कोणी करणार नाही.

सूचना केल्यास सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या मदतीस देखील हजर राहू शकतील, अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक लोेकेश पवार यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Nashik News : उंटवाडीजवळ मद्यधुंद कारचालकाची 3 वाहनांना धडक

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, संघटक रवींद्र दुशिंग, उपाध्यक्ष सचिन पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक दिगंबर शिर्के, शहराध्यक्ष सचिन पाटील, युवती तालुकाध्यक्ष चेतना भागवत, तालुका संपर्कप्रमुख जितेंद्र वाघ, पप्पू पाटील, सुरेश ठाकरे, संजय पवार, मोहन भोळे, बबलू चव्हाण, विजय कदम, मयूर भागवत, मुकुल भागवत, ललित चौधरी, दर्शन चौधरी, धनंजय कुलथे, जगदीश बच्छाव आदी सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक उपस्थित होते.

हिडिसपणा, धिंगाणा थांबवा

गड-किल्ल्यांवर दरवर्षी ३१ डिसेंबरला काही ठराविक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे लोक दारू मटणाच्या पार्ट्यांचे आयोजन करून त्या ठिकाणी हिडिसपणा, धिंगाणा घालण्याचे काम करीत असतात. यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होते आणि गडप्रेमी शिवप्रेमी ही गोष्ट खपवून घेत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता असते.

हेही वाचा: Jalgaon News : पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला