NMU Authority Election : अधिसभा, विद्या परिषदेसाठी 150 उमेदवारी अर्ज दाखल

nmu latest marathi news
nmu latest marathi newsesakal

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १५० उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवारी (ता. १६) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. (NMU Authority Election 150 nominations filed for Adhi Sabha Vidya Parishad jalgaon news)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

nmu latest marathi news
Water Supply Management : सिडको, पूर्व विभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद!; जाणुन घ्या

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिसभेसाठी महाविद्यालयीन अध्यापकांमधून दहा जागा निवडून द्यावयाच्या असून, गुरुवारी (ता. १५) अर्ज दाखल करायच्या पहिल्याच दिवशी या गटातून २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर विद्यापीठ अध्यापकांमधून तीन जागांसाठी पाच अर्ज दाखल झाले. प्राचार्यांमधून दहा जागा निवडून दिल्या जाणार असून, त्यासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले. व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटांमधून सहा सदस्य निवडून दिले जाणार असून, त्यासाठी आठ अर्ज दाखल झाले.

विद्या परिषदेसाठी प्रत्येक विद्याशाखेनिहाय दोन सदस्य निवडून दिले जाणार असून, त्यासाठी नऊ उमेदवारी अर्ज महाविद्यालयीन अध्यापकांमधून दाखल झाले. अभ्यास मंडळावर संलग्न महाविद्यालय व परिसंस्थांच्या विभागप्रमुखांच्या गटांमधून ९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे, अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

nmu latest marathi news
Nashik Political News : माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांची NCPत पुन्हा घरवापसी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com