जळगाव : कांदा बारदानाचे पैसे कपात नाही; बाजार समितीचे निर्देश

कांदा प्लास्टिक बारदानाचे पैसे कपात न करण्यासंबंधीचे निर्देश जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना दिले आहेत.
Jalgaon Market Committees
Jalgaon Market Committeesesakal

जळगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करताना कांदा प्लास्टिक बारदानाचे पैसे कपात न करण्यासंबंधीचे निर्देश जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव घसरले असून कांदा मातीमोल किमतीने विकला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच कांद्याच्या प्लास्टिक बारदानाची रक्कमही खरेदीदार व्यापारी कापून घेत होते. याबाबत बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कांदा खरेदीदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांना बारदानाचे पैसे कापण्यात येऊ नये, अशी सूचना देण्यात आली. व्यापाऱ्यांनी या निर्णयास संमती दर्शवली असून काही प्रमाणात का होईना कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

Jalgaon Market Committees
यंदा कपाशीचे क्षेत्र वाढणार...
Jalgaon Market Committees
महसुलाच्या उत्पन्नात होणार वाढ; 12 गावांचे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com