Board Exam : बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचारी संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

non teaching staff strike

Board Exam : बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचारी संपावर

जळगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता. २०)पासून बेमुदत संप पुकारला आहे.

बारावीच्या (Board Exam) परीक्षा मंगळवार (ता. २१)पासून सुरू असताना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे कार्यालयीन कामकाजही प्रभावित होत आहे. (Non teaching staff on strike ahead of 12th exams for various demand jalgaon news)

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्यातील महासंघाने संप पुकारला आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना व संलग्न सर्वच महाविद्यालयीन कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे.

मु. जे. महाविद्यालयातील कर्मचारी संघटना त्यात सहभागी झाली असून, अध्यक्ष एस. बी. तागड, उपाध्यक्ष जी. आर. सोनार, सचिव एम. एल. धांडे यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी सोमवारी दुपारी निदर्शने केली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

...अशा आहेत मागण्या

सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना रद्द केलेल्या शासन निर्णय पुनरुज्जीवित करणे, १०, २०, ३० लाभाची योजना विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२० अखेरची प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला

त्यादरम्यानच्या फरकाची थकबाकी लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.