Jalgaon News : 2 वर्षात एकाही पुरुषाने केली नाही शस्त्रक्रिया; कुटुंबनियोजन

छोटे कुटुंब सुखी कुटुंबाचा नारा देताना महिला काकणभरच नाही तर पुरुषांच्या शेकडो पटीने पुढे असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या शस्त्रक्रियांच्या संख्येवरून समोर आले आहे.
Family Planning
Family Planningesakal

Jalgaon News : पुरुषप्रधान देशात महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांची बरोबरी करत आहेत. वाहनाच्या स्टेअरिंगपासून ते विमानाच्या पायलट होण्यापर्यंत बरोबरी करणाऱ्या महिलांचा टक्का दहावी- बारावीच्या बोर्डाच्या बो परीक्षेत अधिक आणि स्पर्धा परीक्षांत बरोबरीने असतो.

छोटे कुटुंब सुखी कुटुंबाचा नारा देताना महिला काकणभरच नाही तर पुरुषांच्या शेकडो पटीने पुढे असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या शस्त्रक्रियांच्या संख्येवरून समोर आले आहे. (Not single man underwent surgical family planning in 2 years jalgaon news)

जिल्ह्यात यंदा आतपर्यंत ५०९ महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर, पुरुषांची संख्या एकही नाही. राष्ट्रीय कार्यक्रम असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उदिष्ट आरोग्य विभागाला एप्रिल ते मार्च या महिन्यात असते.

पुरुष मात्र 'नन्ना' म्हणत पुढे पळत असल्याने दोन वर्षात एकही शस्त्रक्रिया झाली नाही. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाण शून्यावरच आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात गतवर्षी ३९७ महिलांनी तर यंदा ५०९ महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली.

Family Planning
Jalgaon News : फेब्रुवारीत जिल्हा महासंस्कृती महोत्सव; 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

तरी दोन वर्षात एकही पुरुष अशा शस्त्रक्रियेसाठी पुढे आलेला नाही.

"पुरुषांवरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एकदम सोपी व पाच मिनिटांची आहे. यासाठी जनजागृती करूनही अनुत्साह असतो. पुरुषाने शस्त्रक्रिया केली तर त्याला बाहेरील जड काम करता येणार नाही यासह आदी गैरसमज देखील याचे मोठे कारण आहे."- डॉ. जितेंद्र घुमरे, ‘जीएमसी’

Family Planning
Jalgaon News : ‘त्या’ महिला वकिलास अखेर न्याय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com