प्रेरणादायी! निरक्षर महिलेने पूर्ण केला देहदानाचा संकल्प

Body Donate
Body Donateesakal

जळगाव : फरकांडे (ता. एरंडोल) या लहान गावातील महिला श्रीमती विमलबाई मधुकर कापुरे (वय ७३) यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आणि तो नुकताच पूर्णदेखील झाला. निरक्षर महिलेचा हा निर्धार व त्याची पूर्णकृती समाजासाठी आदर्श ठरणारी आहे.

Body Donate
ATM Security: एक चूक अन् बँक खाते रिकामे, एटीएममधून पैसे काढताना अशी घ्या काळजी

विमलबाई व त्यांचे पती मधुकर कापुरे हे फरकांडे या गावी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. दोन मुले व दोन मुली यांचा सांभाळ करीत त्यांना मोठे केले. लग्न करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडली. विमलबाई या गर्भवती महिलांच्या प्रसूती करीत असत. त्यामुळे परिसरात त्या ‘दाई’ म्हणून परिचित होत्या.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Body Donate
Pune Crime: डोक्यावर गांजाचं पोतं घेऊ निघाल्या सासू-सून; पोलिसांनी केली 'अशी' कारवाई

आईने बोलून दाखविलेली भावना त्यांच्या मुलांनी पूर्णत्वास नेली. नुकतेच २३ नोव्हेंबरला त्यांचे निधन झाले. कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करीत आईच्या इच्छेची पूर्ती केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com