Akshaya Tritiya 2023 : पिंप्राळ्यात बारागाड्या ओढण्याचा उत्साह...! ‘भवानी माता की जय’चा जयघोष

Bhagat Hilal Bhil pulling 12 carts in Pimprala
Bhagat Hilal Bhil pulling 12 carts in Pimprala esakal

Jalgaon News : येथील पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेनिमित्त शनिवारी (ता. २२) सायंकाळी बारागाड्या ओढण्यात आल्या. बारागाड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (On occasion of Akshaya Tritiya in Pimprala baragadya were pulled jalgaon news)

पिंप्राळ्यात बारागाड्यानिमित्त विविध प्रकारची खेळणी, दुकाने लावण्यात आली होती. भवानी देवीच्या मंदिरावर भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ‘भवानी माता की जय’चा जयघोष करीत गुलालाची व भंडाऱ्याची उधळण करीत बारागाड्या ओढण्यात आल्या.

सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. भगतासह भाविकांनी बारा गाड्यांना पाच प्रदक्षिणा मारल्यानंतर पिंप्राळ्याच्या मुख्य रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलापासून तलाठी कार्यालयापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. त्या भगत हिलाल भिल यांनी ओढल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Bhagat Hilal Bhil pulling 12 carts in Pimprala
Jalgaon News : उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्ह्यात; पिंप्राळ्यात शिवस्मारक जागेचे भूमिपूजन

उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक मयूर कापसे, विजय पाटील, नगरसेविका शोभा बारी, पोलिस पाटील विष्णू पाटील, संजय सोमाणी, पंकज सोमाणी, अतुल बारी, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे आदी उपस्थित होते. पिंप्राळ्यात बारागाड्याची परंपरा ७३ वर्षांपासून सुरू आहे.

बारा गाड्यांचा उत्सव भगत (कै.) भावडू टिबा चौधरी यांनी सुरू केला असून, त्यांनी तब्बल चोवीस वर्षे बारा गाड्यांच्या उत्सवात सहभाग घेतला आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव सुकलाल चौधरी यांनी ही परंपरा सुरू ठेवली. आता भगत हिलाल भिल हे बारा गाड्या ओढतात.

Bhagat Hilal Bhil pulling 12 carts in Pimprala
Akshaya Tritiya 2023 : संत सखाराम यात्रोत्सवास स्तंभारोपण, ध्वजारोहणाने प्रारंभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com