Akshaya Tritiya 2023 : संत सखाराम यात्रोत्सवास स्तंभारोपण, ध्वजारोहणाने प्रारंभ

Sant Sakharam Yatrotsav
Sant Sakharam Yatrotsav esakal

Jalgaon News : येथील संत सखाराम यात्रोत्सवास अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ध्वजारोहण व स्तंभारोपण होऊन शुभारंभ करण्यात आला. या उत्सवानिमित्त वाडी संस्थान व नदीपात्र भक्तांनी फुलले होते, संत प्रसाद महाराज तसेच सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (Sant Sakharam Yatrotsav was inaugurated on occasion of Akshaya Tritiya jalgaon news)

सर्वप्रथम सर्व मान्यवर व भक्तगण वाडी संस्थांनच्या मंदिरात दाखल झाल्यानंतर आधी विठ्ठल रुक्माईचे दर्शन व पूजन होऊन त्यानंतर सकाळी साडेनऊला संत प्रसाद महाराज भक्त गणांसोबत वाजत गाजत नदीपात्रात दाखल झाले. या वेळी संत सखाराम महाराज संस्थानच्या समाधीसमोर आधी अन्नपूर्णा पूजन झाल्यानंतर सुरुवातीला ध्वजारोहण व त्यानंतर स्तंभारोपण करण्यात आले.

या वेळी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, जिजाऊ संस्थेच्या अध्यक्ष ॲड. ललिता पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे, उद्योगपती विनोद पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, न्यायाधीश गुलाबराव पाटील, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्रवीण पाठक, पंकज मुंदडा, मनोज पाटील, भैरवी वाघ पलांडे, प्रा. श्याम पाटील,

वकील संघ अध्यक्ष दीपेन परमार, वसुंधरा लांडगे, महेंद्र महाजन, मनोहर महाजन, नितीन निळे, योगराज संदनशिव, संजय कौटिक पाटील, प्रताप शिंपी, प्रताप साळी, संजय चौधरी, सोमचंद संदानशिव, राजेंद्र यादव, पंडित चौधरी, अभियंता डिगंबर वाघ, श्रीराम चौधरी, बाळू पाटील, अप्पा येवले, महेश कोठावदे, उदय देशपांडे, पवन शेटे, मनोज भांडारकर, प्रा. सुभाष महाजन, राजेश पाटील, सुनील शिंपी, पोलिस उपनिरीक्षक श्रद्धा इंगळे,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sant Sakharam Yatrotsav
Akshay Tritiya : अक्षयतृतीयेसाठी फळांचा राजा खातोय भाव! बाजारपेठेत घागरी खरेदीसाठी गर्दी

शहर तलाठी स्वप्नील कुळकर्णी, विवेक भांडारकर, दोरकर, अनिल महाजन,चंद्रकांत साळी, सुनील भोई, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय पाटील, किरण पाटील, समाधान मैराळे, जितू ठाकूर, आर. जे. पाटील, मिलिंद पाटील, सुखदेव ठाकूर, महेंद्र पाटील, विजय पाटील तसेच महाराजांचे चोपदार सुभाष बागुल, प्रकाश बडगुजर, हिंमत बडगुजर, दिलीप बागुल, गणेश बागुल आदी उपस्थित होते.

शामियानात भक्तांची मांदियाळी

स्तंभारोपण संस्थानचे पुजारी अभय देव यांच्या हस्ते तर पौराहित्य जयप्रकाश देव, सुनील देव, प्रशांत भंडारी, केशव पुराणिक, उदय पाठक, अभय जोशी यांनी केले. या वेळी समाधीसमोर टाकलेल्या शामियानात भक्तांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती. सुरुवातीला प्रधान महाराजांनी विविध मान्यवरांना प्रसाद, नारळ आणि निमंत्रण पत्रिका देऊन यात्रोत्सवाची जबाबदारी दिली. त्यानंतर सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले.

Sant Sakharam Yatrotsav
Akshay Tritiya : शुभ मुहूर्तावर ‘सोनेरी’ झळाळी; दरात वाढ तरी खरेदीसाठी गर्दी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com