Jalgaon News : आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Jalgaon News : आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या

यावल : तालुक्यातील चिंचोली येथील एकाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. ३) घडली.

याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चिंचोली (ता. यावल) येथील समाधान गिरधर बडगुजर (वय ४८ ) हा गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होता. (One person committed suicide due to illness Jalgaon News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

आजाराला कंटाळून त्याने शुक्रवार (ता.३)घरी एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच तातडीने यावल पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह तेथून येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये आणला.

येथे डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात राहुल बडगुजर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार रवींद्र पाटील करीत आहे. समाधान बडगुजर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.