Jalgaon Water Scarcity : गिरणा धरणात केवळ 30 टक्के पाणी; प्रकल्पीय जलसाठ्यात कमालीची घट

Girna Dam
Girna Damesakal

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या सिंचन प्रकल्पात सरासरी ४९.२०, तर अन्य लघु व मध्यम प्रकल्पांत सरासरी ४५.७२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गिरणा ३०.४४ टक्के, तर हतनूर प्रकल्पात ६३.४३ टक्के साठा आहे. दोन्ही प्रकल्पांतील पातळी झपाट्याने खाली गेली आहे. (Only 30 percent water in Girna Dam jalgaon news)

गिरणा कालवा समितीच्या समन्वयातून सिंचनाचे तीन, तर पेयजलाची दोन, अशी पाच आवर्तने होती. त्यापैकी पेयजलाची दोन आवर्तने शिल्लक आहेत. मात्र, तिसऱ्या आवर्तनादरम्यान सलग महिनाभरापासून गिरणा डावा कालव्यातून ६० क्यूसेक पाणी सुरू आहे.

सद्यःस्थितीत हवामानाचा अंदाज आणि वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहाता ‘अल निनो’मुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या प्रकल्पीय पातळीत प्रचंड घट होत असून, शासन स्तरावरून संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी किमान तीन ते चार महिन्यांसाठी जलनियोजन आराखडा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पावर भुसावळसह अमळनेर, चोपडा व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे, तर चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोलसह अमळनेर तालुक्यातील काही भाग, अशा १५० ते २०० गावांचा पाणीपुरवठा योजना तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगावसह त्या तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत. असे असताना गिरणा प्रकल्पात केवळ ३०.४४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट जाणवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Girna Dam
Jalgaon Leopard Attack : जामदा शिवारात बिबट्याचा पशुसंहार; शेतातील जनावरांवर झडप

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर प्रकल्पात सद्यःस्थितीत ७४.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. महापालिकेने राज्य शासनाला दिलेल्या अहवालानुसार शहराला दोन वर्षे पुरेल इतका पाणीसाठा वाघूर धरणात असल्याचे म्हटले आहे.

त्यामानाने गिरणा व हतनूर प्रकल्पांची उपयुक्त जलपातळी पाहता जिल्हा प्रशासनाच्या टंचाईपूर्व जलनियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे दिसून येत आहे.

गिरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यांपैकी चाळीसगाव शहरासाठी थेट मोठ्या जलवाहिनीद्वारे तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पाचोरा व भडगाव शहरात तब्बल पाच ते सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. पाचोरा शहराला गिरड केटिवेअर, तसेच बहुळा प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुविधा असूनही पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

Girna Dam
Jalgaon Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीत 512 व्यापाऱ्यांना दिलासा

वाघूर प्रकल्पात ७४.१२ टक्के पाणीसाठा

जळगाव शहराला पूर्वी गिरणा-दापोरा बंधारा पंपिंग स्टेशन, तसेच भुसावळ-तापी प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर वाघूर प्रकल्प पूर्णत्वानंतर जळगावकरांसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. वाघूर प्रकल्पात सद्यःस्थितीत एकूण साठा २४८.५५ दशलक्ष घनमीटर, जिवंत साठा १८४.२३ दशलक्ष घनमीटर अर्थात, उपयुक्त जलसाठा ७४.१२ टक्के आहे.

अजून तरी दोन वर्षे पुरेसा पाणीसाठा असल्याने टंचाई होणार नसल्याचा दिलासा जळगावकरांना आहे. जळगाव शहराची लोकसंख्या सुमारे सहा लाख असून, वाघूर धरणात पाणी आरक्षण ४० दशलक्ष घनमीटर आहे. शहरास रोज ९० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणातील पाणीसाठा दोन वर्षे पुरेल एवढा असल्याचे अहवालात म्हटले आहे.

"जिल्ह्यातील प्रकल्पांत सरासरी ४५.७२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. प्रकल्पीय उपलब्ध पाणीसाठा पाहता शासन निर्देशानुसार पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे." -अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव

Girna Dam
Jalgaon News : महसूलच्या कामाला आजपासून गती; संपानंतर सलग 3 दिवस सुटया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com