
जळगाव : येथील विवेकानंदनगरातील केमिस्ट भवनजवळ असलेल्या बगीचासमोर अवैधरीत्या वाळूचा साठा करून बांधकाम सुरू होते. त्याप्रकरणी शुक्रवारी (ता. २३) तहसिल कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून तीन ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. डॉ. अमोल पाटील यांचे बांधकाम सुरु आहे. वाळू उपसा बंद असताना वाळू कोठून आणली याचे उत्तर संबंधित देऊ शकले नाही. यामुळे आज तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी राजेश भंगाळे, तलाठी आर. के. बाऱ्हे यांनी वाळूसाठा जप्त केला आहे. (Opposite Vivekanandanagar Garden Illegal sand reserves seized Jalgaon crime news)
‘सकाळ’ ने नुकतेच वाळूउपसा बंद असताना शहरासह जिल्ह्यात बांधकाम सुरू असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावरून आज तहसिलदारांनी अचानक बांधकामे पाहणी मोहीम सुरू केली. त्यात हा साठा आढळून आला. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. त्याठिकाणी महसूल अधिकाऱ्यांनी अचानक मोहीम राबविली तर सर्वच ठिकाणी वाळूचे साठे केलेले आढळून येतील. त्याचा शोध महसूल विभागाने घ्यावा, अशी मागणी सर्वसामान्य करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.