Jalgaon News : मोबाईल न दिल्याच्या रागातून सहावीच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

मुलीच्या हातून आईने मोबाईल घेत तिला अभ्यास करण्यास सांगितल्याच्या रागातून बारा वर्षाच्या मुलीने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.
Out of anger over not being given mobile phone girl of class six took extreme steps jalgaon news
Out of anger over not being given mobile phone girl of class six took extreme steps jalgaon newsesakal

Jalgaon News : मुलीच्या हातून आईने मोबाईल घेत तिला अभ्यास करण्यास सांगितल्याच्या रागातून बारा वर्षाच्या मुलीने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. पद्मश्री ऊर्फ परी भरत पाटील (वय १२) असे गळफास घेतलेल्या चिमुरडीचे नाव आहे. (Out of anger over not being given mobile phone girl of class six took extreme steps jalgaon news)

शनिवारी रात्री अकराच्या सुमारास रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत हा प्रकार घडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अयोध्या नगर परिसरातील एका शाळेत शिक्षक असलेले भरत पाटील हे रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत रहायला आहेत.

त्यांची मुलगी पद्मश्री ऊर्फ परी ही सारखा मोबाईल खेळत असल्याने तिच्या आईने मोबाईल हिसकावून घेत अभ्यास करायला लावला.

याचा राग आलेल्या पद्मश्रीने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोक्याच्या कडीला ओढणीने गळफास घेत जीवन संपविले.

Out of anger over not being given mobile phone girl of class six took extreme steps jalgaon news
Jalgaon News : रायसोनी महाविद्यालयात ‘उडी उडी जायें...’! पतंग महोत्सव रंगला

बराच वेळ झाला तरी परी खाली न आल्याने कुटुंबीय वरच्या खोलीत गेले. दरवाजा ठोठावूनही मुलगी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला.

त्यावेळी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले.

पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. परी ओरिऑन इंग्लिश मीडियम मध्ये सहावीत होती. ती अभ्यासात देखील हुशार होती. तिच्या या टोकाच्या पावलामुळे मुलांच्या मेंदूवरील मोबाईलचा अंमल हा विषय चर्चेत आला आहे.

Out of anger over not being given mobile phone girl of class six took extreme steps jalgaon news
Jalgaon Crime News : लग्न करून देत नसल्याने जन्मदात्या पित्याचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com