Jalgaon News : वावडेत यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात

Agriculture Update
Agriculture Updateesakal

वावडे (ता. अमळनेर) : दरवर्षी सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात कांदा लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरवात होत असते, परंतु याच टप्प्यात शेतकऱ्यांची मका, तसेच इतर पिके सोंगणीची कामे असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरटंचाई निर्माण होत असते.

मजूरटंचाईला वैतागून अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला फाटा देऊन इतर पिके घेण्याचा निर्णय घेतला, परंतु वावडे येथील शेतकऱ्याने यावर यांत्रिकीकरणाचा पर्याय निवडला असून, यंत्राचा वापर करीत मंजूरटंचाईच्या समस्येवर मात केली आहे. कांदा लागवड यंत्रामुळे नऊ तासांत एक एकर कांदा लागवड केली जात असल्याने चांगला पर्याय मिळाला आहे.(Overcome labor shortage through mechanization in Wakad Jalgaon Agriculture News)

Agriculture Update
Jalgaon News : पाळीव कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा दाखल

वावडे येथील चंद्रकांत पाटील या शेतकऱ्याने साडेतीन लाख खर्च करून कांदा लागवडीचे यंत्र खरेदी केले, क्षेत्र जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरीसाठी पैसेही खर्च होऊन वेळेवर मजूरही मिळत नव्हते. पर्यायाने कांदा रोपेही खराब होत होती, परंतु आता यंत्राद्वारे कांदा लागवड सुरू असल्याने नऊ तासात एक एकर कांदा लागवड होत असून, त्यामध्ये कांदा लागवडीबरोबर सारेही पाडले जात असल्याने इतर खर्चातही बचत झाली आहे.

साधारणपणे एक एकर कांदा लागवडीसाठी ३० मजूर एक दिवसात कांदा लागवड करतात. साधारणपणे आज एक एकर कांदा लागवडीसाठी दहा ते अकरा हजार रुपये मोजावे लागत असून, त्याशिवाय एक एकर सारे पाडण्यासाठी दोन हजार रुपये व शेत बांधण्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Agriculture Update
Jalgaon Crime News : वशीकरणाच्या उताऱ्यासाठी बाबाला दिले 50 हजार

मजुरांना ने -आण करण्यासह साधारणपणे एक एकर कांदा लागवडीसाठी १६ ते १७ हजार रुपये खर्च येतो, पण आता मात्र या यंत्राद्वारे पाच मजूर बारा लिटर डिझेलमध्ये एक एकर कांदा लागवड करतात. पाच मजूर आणि डिझेल खर्च धरता एका एकरासाठी चार हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच नऊ ते दहा हजार रुपयांची बचत होऊन कांदा लागवडही वेळेवर होत आहे.

"माझी दरवर्षी नऊ ते दहा एकर कांदा लागवड होत असते. त्यामुळे एवढ्या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात मजूरटंचाईला सामोरे जावे लागत होते आणि वेळेवर कामेही होत नव्हती, पण आता यंत्राद्वारे नऊ तासांत एक एकर कांदा लागवड होणार असल्याने एक एकरात कांदा लागवडीत साधारणपणे दहा ते बारा हजार रुपयांची बचत होणार असून, वेळेवर कांदा लागवड होणार आहे."

- चंद्रकांत पाटील, शेतकरी

Agriculture Update
Jalgaon Crime News : Pan Card Update करण्याच्या बहाण्याने फसवणुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com