Jalgaon News : पाडळसेला ‘नाबार्ड’ च्या वाकुल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Padalse Project

Jalgaon News : पाडळसेला ‘नाबार्ड’ च्या वाकुल्या

अमळनेर : पाडळसे प्रकल्पाला ‘नाबार्ड’ कडून कर्ज मिळण्याआधीच मोठा गवगवा झाला होता. मात्र, पाडळसेला ‘नाबार्ड’ ने वाकुल्या दाखवल्या. तर दोंडाईचा औष्णिक वीज प्रकल्पही पळविण्यात आल्यामुळे उरलीसुरली आशाही मावळली. तर मुंबई- दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉर थंड बस्त्यात आहे.

तत्कालीन युती सरकारने आपला कालावधी संपायच्या अंतिम टप्प्यावर राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना ‘नाबार्ड’ कडून १५ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करणार असल्याचे घोषित केले होते. त्यापैकी १५०० कोटी पाडळसेला मिळणार असल्याचेही जाहीर केले. मात्र, सरकारने नाबार्डची अनुमती न घेताच हा घोषणेचा साळसूदपणा केल्याचे नंतर निष्पन्न झाले. (Padalse Project Loan from Nabard cancelled Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Crime News : गणेश कॉलनीत हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय

या प्रकल्पाचा शिंदखेडा तालुक्यातील ८०० व धुळे तालुक्यातील १६०० हेक्टर शेतजमिनीला लाभ होणार आहे. त्यामुळे रावलांसह कुणाल पाटील यांनीही या प्रकल्पासाठी बोलायलाच हवं. तापी पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या चिमणराव पाटलांनी प्रकल्पामुळे आपल्या तालुक्यातील १६५४ हेक्टर शेतजमिनी ओलिताखाली येत असल्याचे डोळ्यापुढे ठेवत जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक होते.

पूर्वीच्या सरकारमध्ये बीन बजेटच्या खात्याचे व आता स्वतः स्थापन केलेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांनी धरणगाव तालुक्यातील ११४६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने सहाही मतदारसंघातील आमदारांची मोट बांधत पाडळसेसाठी जोर लावला पाहिजे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Nashik Political News : आगामी निवडणुकीत भाजप- सेना युतीचा भगवा; मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

वीज तुटवड्याचा मोठा प्रश्‍न

प्रकल्पाच्या निर्मितीआधीच कोणी पाणी चोरलं तर कोणी वीज चोरली आहे. वीज तुटवड्याचा मोठा प्रश्‍न आता ‘आ’ वासून आहे. पाडळसे प्रकल्पातून ५ उपसा योजनांद्वारा ६०० हेक्टर शेतजनिमीपर्यंत पाणी पोचविण्यासाठी ३४ हजार १८२ हॉर्सपॉवरची आवश्यकता आहे.

त्यात ९५६ एचपीच्या २, ११०० एचपीच्या ३, १०६४ एचपीच्या ३, ९२७ एचपीच्या ३, १४२१ एचपीच्या ३ अशा मोटार लागणार आहेत. त्यासाठी प्रस्तावित दोंडाईचा औष्णिक वीज प्रकल्पातून ३३० वॅटच्या ५ संचांद्वारे वीजनिर्मिती होणार होती. मात्र, तत्कालीन मंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघातील दोंडाईचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प त्यांच्याच भाजपचे तत्कालीन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी चंद्रपूरला पळविल्याचे ऐकिवात आहे.

हेही वाचा: Nashik News : NMC उत्पन्नाची तूट तब्बल सव्वाचारशे कोटींवर; चालू आर्थिक वर्षाचे अंदाज कोलमडले