जळगाव : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग

parents shopping educational materials
parents shopping educational materialsesakal
Updated on

पाचोरा (जि. जळगाव) : शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी (Educational materials shopping) लगबग वाढली असून यंदा शैक्षणिक साहित्यांच्या किमती वाढल्याने सामान्य व मध्यमवर्गीय पालकांची शैक्षणिक खर्चासाठी दमछाक वाढली आहे. (parents buying educational materials started in chalisgaon Jalgaon education news)

गेल्या १५ जूनपासून प्राथमिक, माध्यमिक शाळांसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. पाचवी, आठवी व अकरावी वर्गाच्या प्रवेशासाठी शिक्षकांना भटकंती करावी लागत आहे. विविध प्रकारची आमिषे दाखवून जास्तीत जास्त शाळा सोडल्याचे दाखले मिळवण्याचा प्रयत्न विविध शाळातील शिक्षकांकडून केला जात आहे. शैक्षणिक फी वाढ नसली तरी विविध शैक्षणिक साहित्याच्या किमती मात्र वाढल्या असल्याने बहुतांश पालकांचे नियोजन कोलमडले आहे.

parents shopping educational materials
जळगाव : स्टेट बॅंकेतून 7 लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक

शासनातर्फे शालेय पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात मिळाली तरी दप्तर, वह्या, गणवेश, बूट, वॉटर बॅग, कंपास, चित्रकला साहित्य, प्रात्यक्षिक बुक अशा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बुक स्टॉल वर तसेच गणवेशासाठी रेडिमेड कपड्यांच्या दुकानावर विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढली आहे. अनेक शाळांनी गणवेशासंदर्भात नियोजन केले असले तरी त्याचे पैसे पालकांना भरावे लागत आहेत. एकीकडे पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे तर दुसरीकडे प्रवेश प्रक्रिया व शैक्षणिक साहित्य खरेदी यासाठी आर्थिक नियोजन प्राधान्याने करावे लागत आहे. ग्रामीण भागातील पालकांचे यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले असल्याचे चित्र आहे.

parents shopping educational materials
Jalgaon : पोटच्या मुलाला सोडून आई फरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com