Sakal Impact : पारोळा क्रीडा संकुलाचा होणार कायापालट; लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात

क्रीडा संकुल ओसाड पडले होते. मैदानात झाडे-झुडपे वाढल्याने सुविधांअभावी खेळाडूंची गैरसोय होत होती.
District Bank Vice President Amol Patil while inspecting the sports complex site
District Bank Vice President Amol Patil while inspecting the sports complex siteesakal

पारोळा : येथील क्रीडा संकुल ओसाड पडले होते. मैदानात झाडे-झुडपे वाढल्याने सुविधांअभावी खेळाडूंची गैरसोय होत होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त मालिका प्रसिद्ध केली. त्यानंतरही पाठपुरावा सुरूच होता. याची दखल घेत तीन महिन्यांपूर्वी आमदार चिमणराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना क्रीडा संकुलाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, गुरूवारी (ता. ८) जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी क्रीडा संकुलाची पाहणी केली व प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचे सांगितले. (Parola sports complex to be transformed jalgaon news)

त्यामुळे ‘सकाळ’च्या पाठपुरावाला यश आले असून, लवकरच तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होणार असल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होऊन बंदिस्त व खुले, असे सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुल असावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून

मागणी केली जात होती. दरम्यान, आमदार चिमणराव पाटील यांनी क्रीडा संकुलाच्या कामाला गती निर्माण व्हावी, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करून पारोळा व एरंडोल तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली होती.

मंजुरीनंतर तातडीने प्रशासकीय बाबी पूर्ण करून काम सुरू करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या क्रीडा संकुलाच्या कामाच्या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून या कामाला अखेर सुरवात होणार आहे.

District Bank Vice President Amol Patil while inspecting the sports complex site
Jalgaon Agriculture News : विषम वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका

त्यामुळे या कामाची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी करून मैदान खेळांसह इतर बंदिस्त खेळ सुरू करण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे, तसेच वॉकिंग, योगा यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध देणे.

येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग व इतर व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, लवकरच हे क्रीडा संकुल क्रीडाप्रेमींना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.

‘सकाळ’च्या पाठपुराव्याचे कौतुक

‘सकाळ’ने तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा पारोळा क्रीडा संकुल ओस पडलेल्या व भग्नावस्थेत असलेल्या क्रीडा संकुलाची विविध विषय घेत मालिका सुरू केली होती. दरम्यान, या संदर्भात क्रीडा संकुलाच्या कामाला सुरवात होणार असल्यामुळे शिक्षकांसह क्रीडाप्रेमींनी ‘सकाळ’च्या या पाठपुराव्याचे कौतुक केले आहे.

District Bank Vice President Amol Patil while inspecting the sports complex site
Jalgaon Municipality News : महापालिकेचा नो-व्हेईकल डे ‘भातुकलीचा खेळ’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com