Jalgaon Crime : न्यायालयाबाहेरच वाहनचोरावर पोलिसांची झडप; 21 वाहने जप्त

Arrested Pawan Patil
Arrested Pawan Patilesakal

जळगाव : शहरातील जिल्‍हा न्यायालय आवारातून मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला शहर पोलिसांनी अटक केली. ताब्यात घेतलेल्या संशयिताला दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, जामीन होताच चोरटा न्यायालय आवारात वाहन चोरताना सापडला.

पवन रविकांत पाटील (वय २४, रा. अवानी, ता. धरणगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून नाशिक-सुरतसह जळगाव शहरातील विविध ठिकाणच्या तब्बल ११ मोटारसायकली मिळून आल्या आहेत. (Police arrest vehicle thief outside court 21 vehicles seized nashik Latest Marathi News)

जळगाव शहरातील गोलाणी मार्केट, न्यायालय आवारासह दिवसाला तीन अशा प्रकारे मोटारसायकली चोरी होत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी वाहन चोरट्याच्या अटकेचे आदेश दिले होते.

निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक संशयित न्यायालय आवारात वाहन चोरी करत असल्याचे कळताच त्यांनी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, विजय निकुंभ, रतन गिते, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे, तेजस मराठे, राजकुमार चव्हाण, अमोल ठाकूर या पथकाने न्यायालय आवारात एका तरुणाला वाहून चोरीच्या प्रयत्नात असताना पकडले.

Arrested Pawan Patil
Nashik : ऊर्ध्व गोदावरीतून 74 हजार हेक्टरांत सिंचन

नाशिकच्या बुलेटसह सुरतची वाहने

अटकेतील पवन पाटील याची चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसीखाक्या दाखवताच त्याने एकामागून एक वाहनांची कबुली देण्यास सुरवात केली. त्यात नाशिक येथून दोन नव्या बुलेट, सुरत येथून शाइन यांसह अकरा वाहने काढून दिली. शहरातील प्रमुख ठिकाणाहून वाहने चोरल्यानंतर ती खेडोपाडी विकून नंतर बाहेरील जिल्ह्यातील महागडी वाहने चोरून आणत असल्याचे त्याने कबूल केले आहे.

लूज इग्नेशनसह मास्टरकी

पोलिसांनी अटक केलेला भामटा पवन पाटील वाहन चोरण्यापूर्वी त्याचे इग्नेशन लॉकची पाहाणी करून घेत असे. लूज इग्नेशन दिसताच गाडी त्याच्या पसंतीला उतरायची. खिशातून मास्टरकी काढून काही मिनिटांत तो वाहन घेऊन पोबारा होत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Arrested Pawan Patil
नियतीने हिरावलेल्या मित्राच्या मदतीसाठी सरसावले ठेकेदार मित्रांचे हात!

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com