
‘कोरोना’चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचे कळविले होते.
जळगाव :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eeknath Khadse) यांची उद्या (ता.१५) सक्तवसुली संचलनालय (ईडी)तर्फे चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी ते स्वत: हजर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आवश्य वाचा- धनजंय मुंडेंवरील आरोप गंभीर; त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
भोसरी येथील भुखंड खरेदी प्रकरणी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालय (ईडी)ने एकनाथराव खडसे यांना नोटीस बजावली आहे. ३० डिसेबर रोजी चौकशीसाठी त्यांना मुबंई येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. या चौकशीसाठी खडसे मुंबईला २७ डिसेबरला रवाना झाले होते. त्या ठिकाणी त्यांनाआजाराची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची ‘कोरोना’चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचे कळविले होते. याबाबत त्यांनी ‘ईडी’कार्यालयास कळवून मुदत मागून घेतली होती. त्यानीही त्यांच मुदत मंजूर केली होती. त्यांना देण्यात आलेली मुदत आता संपली आहे. ‘ईडी’कार्यालयाने चौकशीसाठी उद्या (ता.१५) रोजी हजर राहण्याचे कळविले आहे.
आवर्जून वाचा- 'ती' च्या जिद्दीला सलाम.. गावाच्या समृद्धीसाठी एकटीचा लढा !
खडसे स्वत:हजर राहणार..
एकनाथराव खडसे मुंबईतील ‘ईडी’कार्यालयात चौकशीसाठी स्वत:हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, कि, खडसे स्वत: मुंबईतील ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी उद्या (ता.१५) सकाळी अकरा वाजता जाणार आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे