Sakal Exclusive : ‘टपाल’ विमा योजनेने गाठला 32 हजारांवर पल्ला; ग्रामीण विभागातून अधिक प्रतिसाद

India Post News
India Post Newsesakal

जळगाव : टपाल विभागाने सर्वसामान्यांना दिलेल्या दहा लाखांच्या अपघाती विमाकवच योजनेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठ महिन्यांत जिल्ह्यातील ३२ हजारांवर नागरिकांनी हा विमा उतरविला आहे. ग्रामीण विभागातून योजनेला अधिक प्रतिसाद आहे.

टपाल विभागाने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी ३९९ व ३९६ रुपयांत वार्षिक दहा लाखांची अपघात संरक्षण विमा योजना जून २०२२ ला आणली. (Postal insurance scheme reaches 32 thousand More responses from Rural sector Jalgaon News)

India Post News
Nashik News : विना कथड्याच्या पुलाला तातडीच्या दुरूस्तीची आस

योजना १८ ते ६५ वयोगटांतील व्यक्तींसाठी आहे. विमाधारकाचा मृत्यू, कायमचे अपंगत्व, आंशिक अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. अपघात झाल्यास ६० हजार खर्च, बाह्य खर्चास ३० हजार रुपयांपर्यंत दावा करता येतो.

रुग्ण रुग्णालयात असल्यास दहा दिवसांसाठी प्रतिदिन एक हजार रुपये विमाधारकांना मिळतात. कुटुंबाला रुग्णाच्या वाहतुकीसाठी २५ हजार रुपये खर्च दिला जातो. अपघाती मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी पाच हजार रुपये व विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये दिले जातात.

२९९ रुपयांच्या विमा योजना आहे. मात्र, तिला शिक्षण खर्च, वाहतूक व अंत्यसंस्कार खर्च लागू होत नाही. जिल्ह्यात टपाल विभागाने या योजनेची व्यापक जनजागृती केली आहे. अनेकांना या योजनेचा लाभ झाला आहे.

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

India Post News
Nashik News : नाशिककरांना अद्यापही मेट्रो निओची प्रतिक्षाच; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची फाइल हलेना

"टपाल खात्याने अगदी स्वस्तात विमाकवच दिले आहे. जिल्ह्यात या विमा योजनेला प्रतिसाद मिळत आहे. अजूनही ज्या नागरिकांनी हा विमा उतरवलेला नाही, त्यांनी त्वरित तो उतरवून आपले व कुटुंबीयांचे जीवन सुरक्षित करावे. विमा उतरविण्यासाठी आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा."

-बी. व्ही. चव्हाण, अधीक्षक डाकघर, जळगाव

"सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. केव्हा अपघात होईल, याची शाश्‍वती कोणी देत नाही. टपाल विभागाने अत्यल्प किमतीत वर्षभरासाठी दहा लाखांचा विमा आणला आहे. रग्ण दाखल झाला, तरी तीन हजारांपर्यंत विमा सरंक्षण मिळू शकते."

-मनीष तायडे, वरिष्ठ प्रबंधक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक

India Post News
Nashik News : अदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी : शरद आहेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com