Jalgaon Fraud Crime : चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; बनावट इच्छापत्र प्रकरण

इच्छापत्रात असलेल्या मिळकतीच्या हिश्श्यात बदल करून मृताची बनावट स्वाक्षरी व अंगठा लावून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
pre arrest bail of four was rejected for fake documents jalgaon fraud crime news
pre arrest bail of four was rejected for fake documents jalgaon fraud crime newsesakal

Jalgaon Crime News : इच्छापत्रात असलेल्या मिळकतीच्या हिश्श्यात बदल करून मृताची बनावट स्वाक्षरी व अंगठा लावून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जयेश मुकेश ललवाणी, रोहन मुकेश ललवाणी (दोघे रा. शिरसोली रोड) राजेश शांतिलाल ललवाणी (रा.जयनगर) व अजय शांतिलाल ललवाणी (रा. शिरसोली रोड) अशा चौघांचा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. (pre arrest bail of four was rejected for fake documents jalgaon fraud crime news)

चौघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याविरोधात चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलीप आनंदा कोल्हे (आर्किटेक्ट)यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात नमुद केल्या प्रमाणे.

जळगाव मौजे मेहरूण शिवारात (गट क्रमांक ४६४/१) मध्ये फिर्यादीसह राजेश ललवाणी, (कै.) मुकेश शांतिलाल ललवाणी (दोघे रा. जयनगर) व श्रीराम गोपालदास खटोड अशा चौघांनी मिळून १३ नोव्हेंबर २००१ ला अदलाबदल खत दस्त क्र.( ६३५१) नोंदणीकृत दस्तान्वये घेतली. यापैकी मुकेश ललवाणी हे ५ ऑक्टोबर २०२० ला मृत झाले.

दिलीप कोल्हे यांना मुकेश ललवाणी यांचे इच्छापत्र १५ जून २०२१ मिळाले. इच्छापत्रातील जयेश ललवाणी व रोहन ललवाणी यांनी त्या मिळकतीची विभागणी केली.त्या मिळकतीवर साक्षीदार म्हणून राजेश ललवाणी व अजय ललवाणी यांच्या सह्या आहेत.

pre arrest bail of four was rejected for fake documents jalgaon fraud crime news
Jalgaon Fraud Crime : रेल्वे कर्मचाऱ्यास 65 हजाराचा ऑनलाइन गंडा

आर्किटेक्ट दिलीप कोल्हे यांनी कागदपत्रांची तीन हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी केली. त्या तपासणीत सही व अंगठा खोटा असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

अटकपूर्व फेटाळला.

इच्छापत्राच्या आधारे संबंधित तलाठी यांनी मयत मुकेश यांचे वारस म्हणून जयेश व रोहन ललवाणी यांच्या नावाची नोंद उताऱ्यात केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर चौघांनी जळगाव जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवार (ता.१०) जानेवारीला न्यायमूर्ती एस. एन राजूरकर यांच्या न्यायालयात कामकाज होऊन न्यायालयाने चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

pre arrest bail of four was rejected for fake documents jalgaon fraud crime news
Nashik Balaji investment Fraud Case: ‘बालाजी’ गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील लतिकाचे हैदराबाद कनेक्शन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com