Jalgaon : जिल्ह्यात २.५ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon : जिल्ह्यात २.५ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन

Jalgaon : जिल्ह्यात २.५ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत दोन ते अडीच लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन झाले आहे. यंदा चांगला सिझन असला तरी अत्यल्प कापसाने पंधरा लाख गाठी यंदा कमी होणार आहेत. अधिक गाठींचे उत्पादन व्हावे यासाठी चांगल्या कापसाला मागणी आहे. शेतकऱ्यांकडे यंदा अतिवृष्टीने कमी उत्पादन आलेले आहे. काहींनी कापूस विकला मात्र काहींना कापसाला अजून ९ ते ९५०० हजार असा दर मिळेल, अशी आशा लागून आहे. यामुळे त्यांनी कापूस विक्रीस काढलेला नाही.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

सध्या व्यापारी कापसाला ८ ते ९ हजार असा दर देताहेत, मात्र तो दर सर्वाधिक चांगल्या कापसाला. वास्तविक दर साडेसात ते आठ हजार रूपये असल्याचे कापूस व्यापारी सांगतात. यंदा कपाशीचे उत्पादन घटले आहे, ही बाब गृहीत धरूनच हमीदरापेक्षा (५८५०) अधिकचा दर व्यापारी देत असल्याचे सांगण्यात आले. गतवर्षी खासगी व्यापारी कापसाला ४५०० ते ७००० हजारापर्यंत दर देत होते. ७ हजाराचा दर जूनमध्ये होता. यंदा साडेसात ते आठ हजारांचा दर दिला जात आहे. इंटरनॅशनल बाजारात मागणी, राज्यातील मागणी लक्षात घेता त्यावरून कपाशीचा दर ठरतो. कपाशीचा खरा दर सध्या ८२०० असा आहे.

"यंदा कपाशीचे उत्पादन घटल्याने तब्बल पंधरा लाख कपाशीच्या गाठींचे उत्पादन कमी होणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांना तोटा आहे. बाजारात कपाशीची आवकही कमी आहे. भाव चांगला दिला असला तरी शेतकरी व्यापारी बाजारात कापूस विक्रीस आणीत नाही. शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विक्रीस आणावा."

- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशन

हेही वाचा: 'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

आकडे बोलतात...

  • कपाशीचा खानदेशातील पेरा ९ लाख हेक्टर

  • धुळ्याचा पेरा २ लाख २० हजार हेक्टर

  • नंदुरबारचा पेरा १ लाख १३ लाख हेक्टर

  • जळगावचा पेरा ५ लाख हेक्टर

  • सरासरी एकरी उत्पन्न ५ ते ६ क्विंटल

  • एकरी खर्च पंधरा ते वीस हजार

loading image
go to top