जळगाव : ‘लव जिहाद’विरोधात राज्य शासनाने तत्काळ कायदा करावा यांसह विविध मागण्यांसाठी हिंदू जनसंघर्ष समितीतर्फे शनिवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Protest march against Love Jihad Hindu Jan Sangharsha Samiti demands that government enact law Jalgaon News )
शहरातील शिवतीर्थ मैदानापासून मोर्चास सुरवात झाली. सर्वच मोर्चेकऱ्यांनी हातात भगवे ध्वज, भगवी टोपी घातली होती. यामुळे जळगाव भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून मोर्चा निघाला. मोर्चाच्या अग्रभागी हिंदू ध्वज घेतलेला युवक होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
‘जय भवानी जय शिवाजी, भारतमाता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘राम राम श्रीराम,’ ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘हिंदू एकतेचा विजय असो’, ‘हिंदू जनजागृती समितीचा विजय असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. एका सजविलेल्या वाहनावर महिला रणरागिणी विराजमान होत्या. मोर्चेकऱ्यांच्या हातात विविध फलके होती.
‘गोहत्याबंदी झालीच पाहिजे’, ‘हर हर महादेव’, ‘धर्मांतरणबंदी कायदा करा’, जैन समाज बांधवांचा रथही मोर्चात सहभागी होता. त्यावर ‘सम्मेद शिखरतीर्थ क्षेत्र झालेच पाहिजे’, ‘श्री सम्मेद शिखरजी पर गलत कार्य स्वीकार्य नही होंगे’, ‘तीर्थक्षेत्र बचाव, धर्मा बचाओ’, ‘गोमातेची कत्तल घडविणाऱ्यांचा धिक्कार असो’, असे लिहिले होते.
मोर्चात संत, महंत, धर्माचार्य, वारकरी संप्रदाय, पुरोहित महासंघ, सकल जैन सभा, जळगाव जिल्हा माहेश्वरी सभा, बहुभाषिक महासंघ, स्वामिनारायण संप्रदाय, योग वेदांत सेवा समिती, स्वामी समर्थ संप्रदाय, श्री संप्रदाय, इॅस्कान, गायत्री परिवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद,
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, राजपूत करणी सेना, हिंदू विधिज्ञ परिषद, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती यांसह भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आदी पक्षाचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात रणरागिणी महिला पथक, श्री सम्मेद शिखरजी यांचे महत्त्व सांगणारा चित्ररथ, अधिवक्ते, कीर्तनकार, उद्योजक आदी सहभागी झाले होते.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा, धर्मांतरबंदी कायदा करावा, गोवंश हत्याबंदी कायदाची कठोर अंमलबजावणी करावी, श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र घोषित करण्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले.
वारकरी संप्रदायाचे वरसाडेकर महाराज, माहेश्वरी समाजाचे अशोक राठी, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे श्रीकांत खटोड, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, संजय शर्मा, रागेश्री देशपांडे, सचिन नारळे, अपूर्वा रांका आदींनी मार्गदर्शन केले. प्रशांत जुवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
लव्ह जिहादविरोध कायदा लवकरच
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की पालकमंत्री या नात्याने हिंदू जनजागृती समितीतर्फे मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी आलो आहे. अनेक पक्षांचे पदाधिकारी हिंदू ऐक्यासाठी एकत्र आले आहेत. जे मुस्लिम समाजबांधव आमच्यासोबत असतील, त्यांना ‘इस देशमें रहेना होंगा तो वंदेमातरम’ करना होगा’.
आम्ही कोणत्या धर्माविषयी बोलत नाही. मात्र, आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर आम्ही गांधीजी नाहीत, हे लक्षात ठेवावे. तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आहे. चार महिन्यांपूर्वी गाडी बदलविली. ‘इस रूट की सबी लाइन व्यस्त है, सिधा गुवाहाटी. सत्तेसाठी सतराशे साठ, आमच्यासाठी एकच हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
हिंदू एकजुटीचे मी आभार मानतो. आमच्यावर मोठी टीका झाली. हिंदू समितीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे तिकडे बसले आहेत. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, अशी ग्वाही देतो.
हिंदी जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट म्हणाले, की लव जिहादला अनेक हिंदू युवती, महिलांना बळी पाडले जाते आहे. यामुळे राज्य शासनाने राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लवकरच अस्तित्वात आणावा. अनेक हिंदू आदिवासी बांधवांचे धर्मांतर बळजबरीने केले जात आहे. धर्मांवर रोखण्यासाठी कठोर कायदा करावा.
राज्यात गोहत्याबंदी कायदा असताना रोजच गोहत्या होत आहे. मग कायद्याचे काय? कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. जैन बांधवांच्या सम्मेध स्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला पाहिजे, आदी मागण्यांसाठी आजचा मोर्चा आहे.
क्षणचित्रे...
* मोर्चेकऱ्यांच्या हातात भगवा ध्वज
* पुरुषांसह महिलांनी घातली होती भगवी टोपी
* वातावरण भगवेमय
* शंख फुंकून मोर्चास सुरवात
* पोलिसांचा तगडा बंदोबस्त
"राज्यात हिंदू महिला, युवतींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. नंतर ‘लव्ह जिहाद’मध्ये षडयंत्र करून फसविले जाते. हिंदू महिला, युवती सुरक्षित नाहीत. यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करून महिलांना संरक्षण द्यावे."
-श्रुती शिरसाठ, महिला रणरागिणी शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.