Jalgaon News : ‘रस्ता रोको’ पूर्वीच आंदोलकांना अटक

Jalgaon: Police while arresting protesters
Jalgaon: Police while arresting protestersesakal

जळगाव : महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. १३) सकाळी दहाला लोकसंघर्ष मोर्चासह विविध संघटनांतर्फे बांभोरी पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते.

आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी अटक सत्र राबवून लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उपमहापौर कुलभूषण पाटील, नीलेश चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना मिळेल त्या ठिकाणावर अटक केली.

यामुळे रस्ता रोको आंदोलन यशस्वी होऊ शकले नाही. पोलिसांनी दडपशाही करून आंदोलकांचे स्वातंत्र्य हिराविल्याचा आरोप लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे यांनी केला आहे.(Protesters arrested even before stop road agitation Jalgaon News)

Jalgaon: Police while arresting protesters
Jalgaon News : RLच्या फर्मची CBIकडून तपासणी

शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी आदींनी राष्ट्रपुरुषांबाबत केलेल्या अपमानकारक विधानामुळे समाजात विद्वेषाचे वातावरण तयार झाले आहे. या षडयंत्राविरोधात शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी मंगळवारी सकाळी बांभोरीसह महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. रस्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

सकाळी दहा मिनिटे आंदोलकांनी महामार्गावर आंदोलन केले. यामुळे पंधरा मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ आंदोलकांना ताब्यात घेत बाजूला नेले. नंतर वाहतूक सुरळीत झाली. काही वेळाने पुन्हा आंदोलक रस्त्यावर आले. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तालुका पोलिस ठाण्यात नेत तेथेच बसवून ठेवले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Jalgaon: Police while arresting protesters
Jalgaon News : रेल्वे मालधक्क्यावरील वाहनामुळे शिवाजीनगर पुलावर अपघात

आंदोलनापूर्वीच अटक

लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, बहुजन जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे यांना रस्ता रोको करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. शिंदे या शिवरामनगरातील निवासस्थानापासून वाहनातून बसून घरून निघताना त्यांचे वाहन अडविण्यात आले. शिंदे यांनी पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला. तासभराने त्यांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमा झाल्याने दोन्ही नेत्यांना अटक करून कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्याबाहेर काढण्यात आले. अमोल कोल्हे, निवेदिता ताढे, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाट, दिलीप सपकाळे, सचिन सोमवंशी आदी उपस्थित होते.

घोषणाबाजीने परिसर दणाणला

‘निषेध असो निषेध असो’, ‘मंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय’, ‘कोश्यारी की हुशारी नही चलेगी’, ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है’, या घोषणा या वेळी देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस, शिंदे सरकारचाही निषेध करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसंघर्ष मोर्चा, बहुजन जनक्रांती मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, छावा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय पारधी महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन पँथरसह अन्य संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Jalgaon: Police while arresting protesters
Jalgaon Political News : महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा; दिलीप पोकळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com