Jalgaon News : शांतताप्रिय एरंडोल शहराचा लौकिक कायम राहण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा

Hindu-Muslim unity
Hindu-Muslim unityesakal

Jalgaon News : शांतताप्रिय शहर अशी ओळख असणाऱ्या एरंडोल शहरात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही ठराविक समाजकंटकांद्वारे केला जात असून, आगामी सण, उत्सव पाहता पोलिसांनी अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.( public hopes that reputation of peaceful city of Erandol will continue jalgaon news )

शहरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, पीर नथ्थू बापू मियां उरूस, रमजान ईद, ईद-ए-मिलाद यासारखे उत्सव अनेक वर्षांपासून शांततेत आणि उत्साहात पार पडत आहेत. हिंदू व मुस्लिम धर्मीय सणांमध्ये कोणताही धार्मिक वाद आजपर्यंत झालेला नाही. हिंदू व मुस्लिम धर्मीय नागरिक एकमेकांच्या उत्सवात सहभागी होऊन शुभेच्छा देत असतात.

यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे हिंदू व मुस्लिम बांधवांचे उत्सव एकाच दिवशी आले होते. शहरातील शांततेचे वातावरण कायम राहावे, यासाठी मुस्लिम समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ईद-ए-मिलाद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा आदर्श निर्णय घेतला होता.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईदचा जुलूस एकाच दिवशी नको, यासाठी मुस्लिम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले होते. श्रीगणेश विसर्जन शांततेत पार पडले. मात्र मिरवणुकीस उशीर झाल्याच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाच्यावतीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Hindu-Muslim unity
Jalgaon News : भूसंपादनाच्या हजारो प्रलंबित प्रकरणांना न्याय केव्हा मिळणार ?

तसेच ईद-ए-मिलाद जुलुसच्या आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र ईदनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूसात सहभागी झालेल्या काही युवकांनी पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांच्या घरासमोर आक्षेपार्ह घोषणा देणे, घरावर बाटल्या फेकणे, तसेच धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कृत्याच्या निषेधार्थ शहरातील हिंदू संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालयावर मूकमोर्चा काढून घटनेचा निषेध केला होता. मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील झालेल्या घटनेबद्दल माफी मागून समाजकंटकांच्या कृत्याचा निषेध केला.

सामाजिक कायकर्ते, पोलिसांची महत्त्वाची भूमिका

शहरात प्रसाद दंडवते यांच्या घरासमोर घडलेल्या प्रकारानंतर देखील शहरात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. मात्र हिंदू व मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेचा निषेध करून शहरातील शांतता कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Hindu-Muslim unity
Jalgaon Crime News : अवैध वाळूची वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले; चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा

पोलिस प्रशासनानेदेखील घटनेची त्वरित दखल घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. पोलिसांनी या घटनेतील प्रमुख सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. समाजकंटकांविरोधात कडक कारवाई केल्यास भविष्यात असे प्रकार करण्याची हिंमत कोणी करणार नाही, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.

Hindu-Muslim unity
Jalgaon News : ‘ई-केवायसी’नंतरही शेतकऱ्यांना पैसा मिळेना; पारोळा तालुक्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com