शेतीच्या वादात काका-पुतण्यामध्ये हाणामारी; अभियंता पुतण्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

शेतीच्या वादात काका-पुतण्यामध्ये हाणामारी; अभियंता पुतण्याचा मृत्यू

एरंडोल (जि. जळगाव) : शेतीच्या वादावरून काका-पुतण्यांमध्ये वाद झाल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन २८ वर्षीय युवा अभियंत्याचा (Engineer) मृत्यू (Death) झाला. या घटनेत काका, काकू, दोन चुलत भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली. (Quarrels over agricultural disputes Death of Engineer nephew Jalgaon News)

गुरुवारी (ता. १२) सकाळी सुनीता महाजन, त्यांचे पती आबा महाजन, मुलगा नीलेश, उमेश असे शेतात जाण्यासाठी निघाले. सामाईक हिश्‍शावरील शेताजवळ पोचले. तेथे जेठ तुकाराम महाजन, जेठाणी उषाबाई महाजन, पुतण्या मनोज, मोठे जेठ सुरेश महाजन, पुतण्या अनिल महाजन आले. तुकाराम व मनोज यांच्या हातात लाकडी दांडके होते. जेठाणी उषाबाई हिच्या हातात खुरपे होते. त्या वेळेस जेठ तुकारामने, ‘तुम्ही शेतात पाय ठेवायचा नाही व शेत जूप करण्यासाठी मागायचे नाही,’ असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरवात केल्याने मोठा मुलगा उमेश त्यांना समजावून सांगत असताना तुकाराम व मनोज यांनी त्यांच्या हातातील दांडके उमेशवर उगारले. त्या वेळी सुनीता महाजन यांचा लहान मुलगा नीलेश याने मनोजच्या हातातील दांडके हवेत धरण्याचा प्रयत्न करताना त्या दांडक्याचा मार नीलेशला लागला.

हेही वाचा: नाशिक : धावत्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने 30 प्रवासी बचावले

तसेच तुकारामने त्याच्या हातातील दांडके उमेशला मारले. उषाबाई हातातील खुरपे घेऊन मागून धावत आल्या व ‘याला जास्त झाले आहे. याला जिवंत सोडू नका,’ असे बोलू लागल्या. या वेळी सुरेश महाजन, अनिल महाजन यांनी उमेशला जमिनीवर खाली पाडून तुकाराम, मनोज, सुरेश, अनिल या चौघांनी लाथाबुक्क्यांनी पोटावर, गुप्तांगावर मारहाण करीत असताना सुनीता महाजन तसेच पती आबा महाजन, मुलगा नीलेश अशांनी उमेशला त्यांच्या तावडीतून सोडवत असताना उषाबाईने सुनीता यांचे केस धरून खाली पाडत लाथाबुक्क्यांनी व उलट्या खुरप्याने मारहाण केली. मारहाण करत असताना गावातील युवराज भाऊलाल महाजन, योगेश युवराज देवरे, रवी फुलारी व त्याची पत्नी हे धावत येत सोडविले. त्या वेळी गर्दी जमा होत असल्याचे पाहत मारहाण करणारे पळाले. मारहाणीत उमेशला मार लागून त्याचे पोट दुखून त्रास होत असल्याने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता उमेशला त्रास होत असल्याने पोलिसांनी वैद्यकीय मेमो देऊन त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी पाठविले.

हेही वाचा: Nashik : शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट; तरुणास अटक

मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. माजी नगरसेवक योगेश महाजन व त्याच्या परिवारातील सदस्यांनी १०८ अॅम्ब्युलन्सने जळगाव येथे नेत उपचारासाठी दाखल केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना उमेशचा गुरुवारी (ता. १२) सायंकाळी पाचला मृत झाला. रात्री उशीर झाल्याने शवविच्छेदन झाले नाही. शुक्रवारी (ता. १३) दुपारी बाराला शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास प्रचंड जनसमुदाय समक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत उमेश याचे मागील वर्षी ६ जून २०२१ ला लग्न झाले होते. उमेश सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीस होता. मृत उमेशची आई सुनीता आबा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Quarrels Over Agricultural Disputes Death Of Engineer Nephew Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonagriculturedeath
go to top