esakal |  76 लाखाचा रेशन धान्याचा अपहार; संस्थेवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

 76 लाखाचा रेशन धान्याचा अपहार; संस्थेवर गुन्हा दाखल}

बोगस कार्ड धारक दाखवून मोठा घोटाळा केल्याची तक्रार पुरवठा विभागाला करण्यात आली होती.

 76 लाखाचा रेशन धान्याचा अपहार; संस्थेवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
अमोल अमोदकर

बोदवड : शहरातील एका महिला संस्थेला रेशन दुकानाचा ठेका दिला होता. यात बोगस कार्ड धारक दाखवून मोठा घोटाळा झाल्याची तक्रार झाली होती. तक्रारीवरून झालेल्या चौकशीत तब्बल ७५ लाख रुपये किंमतीचा रेशन घोटाळा झाला असल्याचा बाब समोर आली आहे. त्यानुसार संस्थेतील सात जणांवर पोलिस गुन्हा दाखल केला आहे.  

आवश्य वाचा- जामनेरमध्ये कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर ‘गुलाबी गँग’महिला पथकाची धडक मोहीम 
 

बोदवड शहरातील मुनफ ठेकेदार युनुस बागवान यांनी 2015 मध्ये सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेला रेशन वाटपाचा ठेका दिला होता. परंतू बोगस कार्ड धारक दाखवून मोठा घोटाळा केल्याची तक्रार पुरवठा विभागाला करण्यात आली होती. याबाबत चौकशी केली असता मे - 2015 ते मे -2018 या कालावधीत तब्बल 75 लाख 75 हजार 816 रुपये किमतीच्या रेशन धान्याचा अपहार झाल्याचे माहिती समोर आली. त्यानुसार  7 संशयीतावर तहसिल कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक रत्नाकर सातपुते यांच्या फिर्यादीवरून गुन्हाची नोंद केली आहे. यात शहिदा परवीन गुलशन खा पठाण,नशिया बानो हाफिज,गौसिया मतीन, रोहिना जुनेदखान पठाण,रहेनबी नाजीर बेग, सयमा परवीन हाफिज, कमल संतोष पाटील अशी सांशीयताचे नावे आहे पुढील उपपोलिस निरीक्षक भाईदास मालचे करीत आहे.

आवर्जून वाचा- खानदेशच्या सुपुत्राचा गुजरात मध्ये डंका ! दुसऱ्यांदा नगरसेवक पदी विजयी
 

असा आहे धान्याचा घोटाळा

43 लाख 42 हजार 616 रुपयांचा गहू , 28 लाख 8 हजार 475 रुपयांची साखर ,आशा एकूण 75 लाख 75 हजार 816 रुपये किंमतीचा शासकीय धान्याचा अपहार केला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे