Raver Lok Sabha Constituency : रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरील अपक्ष उमेदवाराचा आक्षेप फेटाळला

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर शुक्रवारी (ता. २६) संजय कांडेलकर (मुक्ताईनगर) यांनी छाननीवेळी तोंडी आक्षेप घेतला.
Raksha Khadse
Raksha Khadseesakal

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर शुक्रवारी (ता. २६) संजय कांडेलकर (मुक्ताईनगर) यांनी छाननीवेळी तोंडी आक्षेप घेतला. मात्र, त्यांनी आक्षेप घेताना लेखी पुरावे सादर केले नाहीत. खडसेंच्या अर्ज अवैध ठरवावा, असेही म्हटले नाही. (Raver Lok Sabha Constituency)

त्यामुळे त्यांचा आक्षेप पुराव्याशिवाय असल्याचे सांगत तो फेटाळून रक्षा खडसेंचा अर्ज वैध ठरविण्यात आला. संजय कांडेलकर रक्षा खडसेंच्या अर्जावर तोंडी आक्षेप घेत सांगितले, की गौणखनिज प्रकरणात रक्षा खडसेंची एसआयटी चौकशी अहवालामध्ये संपूर्ण परिवारामध्ये १३७ कोटी दंड बुडविला.

म्हणून त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर बोजे बसविण्याबाबत आदेश असताना, त्यांना या प्रकरणात सहज स्थगिती दिली आहे. या प्रकरणात तक्रारदारांनी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले आहे व त्यावर ३० एप्रिलला म्हणणे सादर करावे, असे न्यायालयाने सांगितले आहे. (Latest Marathi News)

Raksha Khadse
Jalgaon Lok Sabha Election : शिरूरच्या मैदानात प्रचारासाठी उतरली ‘मुक्ताईची लेक’; ॲड. रोहिणी खडसेंचा शिक्रापूरला सभांचा धडाका

यामुळे रावेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून छाननी अर्जावर निर्णय घेण्यात यावा. श्री. कांडेलकर यांना म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले. तोपर्यंत खडसेंची तिन्ही अर्ज छाननीसाठी राखून ठेवले. लेखी दिले.

मात्र, त्यांचा आक्षेप कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय दाखल केलेला आहे व आक्षेपाच्या पृष्ठ्यथ्‌ कोणताही पुरावा सादर केलेला नाही. आक्षेप अर्जात त्यांनी कुठेही नामनिर्देशित उमेदवार रक्षा खडसे यांना अवैध ठरविण्यात यावे, अशी मागणी केल्याचे दिसून येत नाही. यामुळे कांडेलकरांचा अर्ज फेटाळण्यात आला.

Raksha Khadse
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात 20, रावेर मतदारसंघात 29 उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com