MAHAGENCO : निवृत्त 18 अधिकाऱ्यांची ‘महाजेनको’कडून पुनर्नियुक्ती

MAHAGENCO
MAHAGENCO esakal

Jalgaon News : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (महाजेनको) नियमित नोकरभरतीमधील आदेश रोखून ठेवत सुटीच्या दिवशी ५ मेस १८ सेवानिवृत्त अभियंत्यांना २ वर्षांसाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करीत असल्याचे आदेश काढले आहेत. (Re appointment of 18 retired officers from Mahagenco jalgaon news)

‘महाजेनको’च्या एचआर विभागाचे मुख्य महाव्यवस्थापकांनी बुद्धजयंतीनिमित्त सुटी असतानाही ५ मे रोजी नियुक्तीचे आदेश काढले. ऐन सुटीच्या दिवशी तडकाफडकी कंत्राटी तत्त्वावरील अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात महाजेनकोचे ७ वीजप्रकल्प आहेत. त्यातून सेवानिवृत्त झालेल्या उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MAHAGENCO
Road Construction : रस्ते कामासाठी अभियंत्यांनी सर्वेक्षण करावे; सुरेश भोळे यांच्या सूचना

ऑपरेशन विभागातील पुरुषोत्तम उपासे, सुनील लोंढे, सुनील पाटील, रवींद्र झांबरे, टबाइन व बॉयलर विभागातील मदन अहीरकर, सुरेश पाटील, प्रवीण तीथेगिरीकर, रवींद्र वासाडे, कोळसा हाताळणी विभागातील भगवंत भगत, संजय पेटकर, हेमंत लहाने, इंदल चव्हाण, इलेक्ट्रिकल व सी अँड आय विभागातील पांडुरंग अमीलकंठवार, सुनील कुलकर्णी, प्रमोद चौधरी, कमलाकर देशमुख, पीओजी विभागातील सुदेश भडांगे आणि राजेश कांबळे या अभियंत्यांचा कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीत समावेश आहे.

महाजेनकोच्या वेगवेगळ्या वीज केंद्रातून हे अभियंते नुकतेच सेवानिवृत्त झाले. खासकरून त्यांची कंत्राटी तत्त्वावर सेवा घ्यावी, यासाठी प्रकाशगडावरील काही वरिष्ठ अधिकारी व ऊर्जा मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी आग्रही असल्याचे समजते. दरम्यान, नवीन नियमित भरतीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

MAHAGENCO
Success Story : पाक सीमेजवळ अहिराणी तरुणाने रोवला झेंडा; तरुणांसाठी रोलमॉडेल...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com