Latest Marathi News | वीजचोरट्यांकडून कोटींचा दंड वसूल; 427 ‘फुकट्या’वर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Power theft case

वीजचोरट्यांकडून कोटींचा दंड वसूल; 427 ‘फुकट्या’वर कारवाई

जीवन चव्हाण : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : ‘आकडे’ टाकून व मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या एकूण सहाशे वीज चोरट्यांवर ‘महावितरण’ने कारवाईचा बडगा उगारला आहे. यापैकी ४२७ वीजग्राहकांकडून एक कोटी दहा लाखांचा दंड महावितरणने वसूल केला असून, ग्रामीण पोलिसात दहा वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: शिंदे सरकारमधील मंत्री सावंत सोलापूर दौऱ्यावर! बार्शीतून थेट भूम-परांड्याला जाणार

राज्यात सध्या वीज गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी महावितरणकडून वीज चोरट्यांविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात धडक मोहीम सुरू आहे. यात ‘आकडे', मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात देखील ही मोहीम मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल ते जुलै-२०२२ मध्ये प्रभावीपणे राबविण्यात आली.

या दरम्यान ६०५ वीज चोरट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या तीन महिन्यात एकूण १० लाख २९ हजार ५४५ युनिट वीजचोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या युनिटची एकूण रक्कम १ कोटी ४६ लाख रुपये आहे. त्यापैकी ४२७ वीजग्राहकांकडून एक कोटी दहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून, चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात १० वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी यामध्ये बहुतेकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची माहीती मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी ‘सकाळ'शी बोलतांना सांगितले आहे.

हेही वाचा: वीज चोरी करताना दुसऱ्यांदा पकडले

महावितरणच्या या कारवाईमुळे वीज चोरट्यांची संख्या घसरणीवर आली असून, अनेक गावे आता ‘आकडेमुक्ती'कडे वाटचाल करीत आहेत. हेच रोलमॉडेल आता जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. दरम्यान, याचे श्रेय फक्त मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांना दिले जात आहे.

''वीजचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अधिकृत मीटरधारकांनी आपल्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी न करता नियमित विजेचा वापर करावा व नेहमी येणारे वीजबिल भरणा करून सर्व वीज ग्राहकांनी सन्मानाने जगावे.'' - संदीप शेंडगे, मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, चाळीसगाव

हेही वाचा: पत्नीच्या आजारपणामुळे ‘तो’ बनला चोर! ५२ व्या वर्षी चोरल्या १० दुचाकी

Web Title: Recovery Of Crores Of Fines From Power Thieves Action By Msedcl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonMSEDCL