

gold silver rate decrease
esakal
जळगाव - सोने आणि चांदीच्या भावात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. ही घसरण आजही कायम राहिली. मागील पंधरवाड्यात, म्हणजे दिवाळीनंतर मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. यात आजच्या भावाचा विचार केल्यास दिवाळीनंतर सोने तब्बल १२ हजार तर चांदी २५ हजार रूपयांनी खाली आली आहे. हे भाव आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.