Jalgaon Crime News : शेतीच्या वादातून हाणामारी; 7 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

Riot case filed against 7 people due to farm dispute Jalgaon Crime News
Riot case filed against 7 people due to farm dispute Jalgaon Crime News esakal

Jalgaon Crime News : शेतीच्या सामाईक बांधावरून तालुक्यातील जुनवणे येथे सख्या चुलत भावांमध्ये वाद निर्माण होऊन सात जणांनी लोखंडी वस्तूने दोघांच्या डोक्यावर मारून रक्तबंबाळ केल्याची घटना रविवारी (ता.२३) रात्री दहाच्या सुमारास घडली. (Riot case filed against 7 people due to farm dispute Jalgaon Crime News )

जुनवणे येथील मनोज मुखत्यारसिंग पाटील यांचे व त्यांच्या चुलत भाऊ काका काकू यांच्याशी शेतीच्या सामायिक बांधावरून वाद सुरू होते. रविवारी (ता. २१) गावकऱ्यांनी त्यांच्यात समजोता घडवून आणला होता.

मात्र, २३ ला रात्री दहाच्या सुमारास मनोज पाटील आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता अनिल श्यामसिंग पाटील, सुनील श्यामसिंग पाटील, त्यांचे मेव्हणे प्रवीण सुभाष पाटील, भूषण प्रवीण पाटील, प्रमोद सुनील पाटील आणि दोन अनोळखी इसम घरचा दरवाजा तोडून घरात घुसले आणि सुनील याने हातातील लोखंडी पासने मनोज यांचा मुलगा सागर याच्या डोक्यावर वार केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Riot case filed against 7 people due to farm dispute Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : जन्मदात्यानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

त्यांनतर अनिलने लोखंडी सळीने मारहाण केली. भांडण आवरायला गेल्यानंतर त्याने मनोजच्या डोक्यात जोराने सळीने मारहाण केली. तसेच मुखत्यारसिंग यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील सामानाची नासधूस केली. गावकऱ्यांनी भांडण आवरले. त्यानंतर मनोज आणि सागर याना जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तेथून त्यांना धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जखमींचा जबाब घेतल्यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात सातही जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संदेश पाटील तपास करीत आहेत.

Riot case filed against 7 people due to farm dispute Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : 2 चोरट्यांना नागरिकांकडून चोप; संशयितांना केले पोलिसांच्या स्वाधीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com