जळगावच्या केळीवरून भर बाजारात दंगल; 2 जखमी, चौघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Protection after riot

जळगावच्या केळीवरून भर बाजारात दंगल; 2 जखमी, चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव : केळी विक्रेत्याकडे शिल्लक असलेल्या एकमेव केळ्याची फणी (bunch of bananas) नेमकी कुणाला मिळते, यावर दोन तरुणांनी विक्रेत्याशी वाद घातला. वादाचे पर्यावसन हाणामारीत आणि नंतर दोन्ही गटांतर्फे लाठ्या काठ्या आणि तुफान दगडफेकीत झाले. चाकू हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (riot over banana in Master colony 2 injured 4 charged Jalgaon Crime News)

शहरातील मेहरुणच्या अक्सानगरात अजहर खान इकबाल खान (वय २८) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. रविवारी (ता. १) सायंकाळी ६.३० वाजता अजहर खान हा मित्र अशरफ खान याच्यासोबत मास्टर कॉलनीतील चटोरी गल्लीत केळी घेण्यासाठी गेला होता. केळी विक्रेत्याकडे शेवटचे दोन डझन केळी शिल्लक होती ते अजहर खान याने खरेदी केली. त्याठिकाणी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकिम पिरजादे आणि रहिम पिरजादे यांनी केळी आम्ही घेतल्याचे सांगून शिवगीळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दानिश पिरजादे यांने खिशातून चाकू काढून अशरफ खान आणि अजहर खान यांच्यावर वार करून जखमी केले. जखमी झालेल्या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: Jalgaon : मौलवीला धमकावणारा‌ खुनाच्या गुन्ह्यात अडकला

अजहर खान यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकिम पिरजादे आणि रहिम पिरजादे सर्व (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील करीत आहे.

हेही वाचा: Jalgaon : लिंकवर क्लिक करताच खात्यातील रक्कम ‘सपाचट’

Web Title: Riot Over Banana In Master Colony 2 Injured 4 Charged Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaoncrimeRiotdangal
go to top