Jalgaon : लिंकवर क्लिक करताच खात्यातील रक्कम ‘सपाचट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mobile Cyber crime

Jalgaon : लिंकवर क्लिक करताच खात्यातील रक्कम ‘सपाचट’

जळगाव : मोबाईलवर लिंक (Mobile Link) पाठवून गिफ्ट (Gift) मिळेल असे सांगितले. मोबाईलवर प्राप्त लिंकवर क्लिक करताच दोघांच्या बँक खात्यातून (Bank Account) परस्पर पैसे वेगळ्याच खात्यांमध्ये वळते करत सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminals) त्यावर डल्ला मारल्याच्या दोन घटना शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे.

शहरातील राहुल महाजन यांच्या तक्रारीनुसार शनिवारी (ता. ३०) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास त्याचे वडील प्रमोद महाजन यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन उचलल्यावर प्रमोद महाजन यांना समोरील व्यक्तीने तुम्हाला गिफ्ट मिळेल, असे सांगत त्यांना लिंक पाठविली. मोबाईलवर प्राप्त लिंक येताच प्रमोद महाजन यांनी त्यावर क्लिक केले. क्लिक करताच त्यांच्या बँक ऑफ बडोदा बँकेच्या खात्यातून २६ हजार रुपये ऑनलाइन वळते झाले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तत्काळ शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; एकाला अटक

दुकान असल्याचे सांगत पैसे केले वर्ग

शहरातील लक्ष्मी राखोंडे यांना एका क्रमांकावरून फोन आला. त्याने लक्ष्मी राखोंडे यांना तुमचे किराणा दुकान असून तुम्हाला बिजनेस फोन-पेवर गीफ्ट मिळाले असल्याचे सांगितले. मी तुम्हाला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा, असे सांगितल्यानंतर राखोंडे यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बॅंक खात्यातून ३७ हजार ४९५ रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर करून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच लक्ष्मी राखोंडे यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली.

हेही वाचा: जळगाव : 3 लाखांसाठी विवाहितेचा छळ

Web Title: Cyber Crime By Mobile Link On One Click Jalgaon Cyber Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top