जळगावात उद्योजकाकडून स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती; मनपा प्रशासन ढीम्म

Road construction
Road constructionesakal

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवर ना महापालिका प्रशासनाकडे उत्तर आहे, ना लोकप्रतिनिधींकडे उपाय. या रस्त्यांवरून वापरताना अक्षरश: नरकयातना भोगणारे नागरिक, मालमत्ताधारक स्वत:च उपाय शोधून काढत आहेत. त्यातूनच जळगावातील प्रसिद्ध उद्योजक रजनीकांत कोठारी यांनी त्यांच्या घरासमोरील रस्त्याची स्वखर्चातून दुरुस्ती सुरु केलीय.

गेल्या सात वर्षांपासून जळगाव शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु झाल्यानंतर तर या रस्त्यांची आणखीच दुरवस्था झाली. संपूर्ण शहरातील रस्ते खोदून ठेवल्याने एकही गल्ली, बोळातील रस्ता सुस्थितीत नाही.

Road construction
जळगावात STच्या बनावट पास विक्रीचा धक्कादायक प्रकार

ढीम्म मनपा प्रशासन
शहरातील नागरिकांकडून रस्त्यांबाबत अनेकदा ओरड झाली, वृत्तपत्रांमधून दररोज रकानेच्या रकाने भरू बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र, मनपा प्रशासन या सर्व बाबींवर ढीम्मपणे केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे.

मालमत्ताकरात वाढ
एकीकडे रस्त्यांची दुरवस्था, दुसरीकडे स्वच्छतेचा बोजवारा.. अशा स्थितीत महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात प्रचंड वाढ करुन नागरिकांना ‘शॉक’ दिला आहे. मालमत्तेत वाढ, वापरात बदल झाल्याचे कारण पुढे करत सरसकट सर्वच मालमत्ताधारकांना करवाढीचा झटका बसला आहे. कोणत्याही मुलभूत सुविधा पुरविल्या जात नसताना मालमत्ता करातील भरमसाठ वाढ नागरिकांच्या पचनी पडलेली नाही. अशाही स्थितीत सहनशील नागरिक मूकपणे करवाढही मान्य करताय आणि रस्त्यांवर नरकयातनाही भोगतांय.

Road construction
भाडे मागणाऱ्या घरमालकाच्‍या डोक्यात टाकला दगड; भाडेकरुविरुद्ध गुन्हा


दुरुस्तीसाठी पुढाकार

महापालिकेकडून काहीच होणार नाही, हे गृहित धरुन आता नागरिक, मालमत्ताधारक आपल्या निवास, व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोरील रस्त्यांची स्वखर्चाने दुरुस्ती करु लागले आहेत. शहरातील विख्यात व ज्येष्ठ उद्योजक रजनीकांत कोठारी यांनीही या कामासाठी पुढाकार घेऊन विसनजी नगरातील त्यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्याची दुरुस्ती हाती घेतली आहे. आज या रस्ता दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. या जवळपास ३०० मीटरच्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांवर मुरुम टाकण्यात आला असून लवकरच त्यावर डांबरीकरणाचे पॅचवर्कही करण्यात येणार आहे.

मालमत्ताकर जातो कुठे?
महापालिकेला मालमत्ता करातून मोठे उत्पन्न मिळते. मंत्री, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांमधून निधी मिळतो. लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून पैसा येतो. मात्र, हा सारा पैसा मूलभूत सुविधांसाठी वापरला जात नसेल तर कुठे जातो? हा प्रश्‍न सर्वसामान्य मालमत्ताधारकांमधून उपस्थित होत आहे.

Road construction
Monkeypox: लस मंकीपॉक्सला रोखू शकत नाही; WHO चं महत्त्वाचं विधान


लाखोंचा कर भरतो, तरी..
रस्ता दुरुस्तीच्या संदर्भात रजनीकांत कोठारी यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, मी रहिवासी व व्यावसायिक म्हणून दोन्ही स्वरुपातील लाखो रुपयांचा कर महापालिकेकडे दरवर्षी जमा करतो. आमचे घर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असूनही रस्ता अनेक वर्षांपासून खराब आहे. अनेकदा तक्रारी करुनही त्याचे काम झालेले नाही. लाखो, कोट्यवधींचा कर भरुनही सुविधा मिळत नाही.. शहरात महापालिका नावाची संस्था आहे तरी का? असा संतप्त प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. या वेळी त्यांच्या समवेत बाळासाहेब
सूर्यवंशी, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com