Jalgaon Crime News : जळगावात भरदिवसा स्टेट बँकेत दरोडा; कोटीचे सोने घेत दोघे पसार

Robbery at State Bank in broad daylight in Jalgaon crime news
Robbery at State Bank in broad daylight in Jalgaon crime newsesakal

Jalgaon Crime News : शहरातील भरवस्तीत कालिंका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत आज अज्ञात दरोडेखोरांनी सकाळी दरोडा टाकून तब्बल १५ लाखांची रोकड अन्‌ कोटीचे सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (Robbery at State Bank in broad daylight in Jalgaon crime news)

शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या शेजारी असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला.

सकाळची वेळ असल्याने बँकेत कर्मचारी वगळता जास्त लोकं नव्हती. कोयता-चॉपरसह बँकेत शिरुन देान दरोडेखोरांनी तीन कर्मचार्यांना ओलीस ठेवत व्यवस्थापक व क्लार्क यांना शस्त्राच्या धाकात बँकेची तिजोरी उघडायला लावून १५ लाखांच्या रोकडसहीत सुमारे एक कोटीचे सोने लुटून पोबारा केला. दरोडेखोरांसह झालेल्या झटापटीत व्यवस्थापकासह एक कर्मचारी जखमी झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Robbery at State Bank in broad daylight in Jalgaon crime news
Jalgaon Crime News : चोरट्यांच्या हिंमतीने आता हद्दच गाठली...! चक्क DYSPच्या दारापुढे चोरी

पोलिसांचा फौजफाटा दाखल

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, जिल्हापेठचे बबन आव्हान यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

दरम्यान, भरदिवसा बँकेत दरोडा पडल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तर पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवायला सुरवात केली होती.

Robbery at State Bank in broad daylight in Jalgaon crime news
Jalgaon Crime News : गाडी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून महिलेवर सुरीने वार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com