
Cyber Crime : अश्लिल चित्रफित प्रसारित करणाऱ्यास 3 लाख रुपये दंड
नाशिक : दोघा तरुणीसोंबत ओळख करत त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो (Pornographic photos) काढून ते प्रसारित करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने विविध कलमांतर्गत साडेतीन वर्ष कारावास आणि तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तरुणीसोंबत ओळख करत त्यांचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढून प्रसारित करणे आरोपीस चांगलेच महागात पडले आहे. (Rs 3 lakh fine for broadcasting pornographic videos Nashik Cyber Crime News)
अक्षय श्रीपाद राव (वय २२, रा. इंदिरानगर) असे आरोपीचे नाव आहे. सायबर क्राइमच्या (Cyber Crime) गुन्ह्यामध्ये शिक्षा लागण्याची अशी पहिलीच वेळ आहे. हा निकाल सायबर गुन्हेगारी वर नक्कीच वचक बसवणारा ठरला आहे. आरोपी अक्षय राव यांनी दोन पीडित तरुणींशी मैत्री करत त्यांना लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून त्यांना जुलै २०१६ ते जुलै २०१७ दरम्यान दोघींना आपल्या घरी वेळोवेळी बोलवून त्यांचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर दोघींची बदनामी करण्याच्या उद्देशाने धमकावित त्यांचे अश्लिल फोटो प्रसारित केले. याप्रकरणी पिडित तरुणीने आरोपी अक्षय राव याच्याविरूद्ध सायबर पोलीस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियम (Information and Technology Act) आणि विनयभंगचा (debauchery) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा: Raj Thackeray : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षांना अटक
या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी कसून तपास करत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे जमा करत दोषारोषपत्र न्यायालयात सादर केले त्यानंतर शुक्रवारी (ता.६) मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.एल.भोसले यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असता फिर्यादी,साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी आधिकारी यांनी सादर केलेले सबळ पुरावे यांवरून आरोपी अक्षय राव यास न्यायालयाने कलम ३५४(अ) सहा महिने सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, कलम ३५४ (क) अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व ५० हजार दंड, माहिती व तंत्रज्ञान कलम ६३ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी १ लाख रुपये दंड आणि कलम ६७ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी १ लाख रुपये दंड अशी एकूण ३ वर्ष सहा महिने सक्तमजुरी आणि ३ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. सुधीर सपकाळे यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा: नाशिक : वीज पुरवठा खंडित असलेल्या ६० हजार ग्राहकांना नोटिस
Web Title: Rs 3 Lakh Fine For Broadcasting Pornographic Videos Nashik Cyber Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..