
Raj Thackeray : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षांना अटक
सातपूर (नाशिक) : भोंगा आंदोलन प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरारी मनसे (MNS) शहराध्यक्ष यांना सातपूर पोलिसांनी पाथर्डी परिसरातून अटक केल्याचे सातपूर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगा काढण्याबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर नाशिकसह राज्यभरात हनुमान चालिसा पठण करण्याचे आंदोलन करण्यात आले होते.
पोलिसांच्या नोटीसेनंतरही केले आंदोलन
यामुळे जातीय तेढ निर्माण होवू नये म्हणून नाशिक पोलिसांनी नोटीसही बजावल्या होत्या. तरीही आंदोलन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मनसे नेते व इतर कार्यकर्त्याची धरपकड केली होती. अनेक कार्यकर्ते तडीपार करण्यात आले होते. दरम्यान, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर हे फरारी असल्याचे बोलले जात होते. नुकतेच दातीर यांना सातपूर पोलिसांनी पाथर्डी परिसरातून अटक केली आहे.
हेही वाचा: राज ठाकरे पुण्यात पोहोचण्याधीच घडामोडी, वसंत मोरे करणार महाआरती
हेही वाचा: बिर्याणी कमी वाढल्याने केला मित्राचा खुन; एकास जन्मठेप
Web Title: Mns Nashik City President Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..