Jalgaon News : आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत साई करणार देशाचे प्रतिनिधित्व

Sai Salve
Sai Salve esakal

वाकोद (जि. जळगाव) : चौदाव्या आंतरराष्ट्रीय (international) कराटे स्पर्धेसाठी कुंभारी येथील साई प्रभाकर साळवे याची निवड झाली. काठमांडू (नेपाळ) येथे २६ मेस ही स्पर्धा होणार आहे. त्यात साई साळवे सहभागी होणार आहे. (Sai will represent country in international karate competition jalgaon news)

साई नेपाळ येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. साईने यापूर्वीही गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सुवर्णपदक मिळवले आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांचा तो मुलगा आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Sai Salve
Gulabrao Patil | बाजार समिती निवडणुका युतीतर्फेच लढणार : गुलाबराव पाटील

साईच्या निवडीबद्दल पंचक्रोशीतून त्याचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत एकूण दहा देशांचा समावेश आहे. त्यात बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, चीन आदी देश सहभागी होणार आहेत. साई सोळा वर्षांखालील गटात खेळणार असून, तो भारताला सुवर्णपदक आणण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याचे शिक्षक आसिफ शेख यांचे साईला मार्गदर्शन मिळत आहे.

Sai Salve
Market Committee Election : स्मिता वाघ, शिरीष चौधरी निवडणूक एकत्र लढणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com