SAKAL Drawing Competition : गुलाबी थंडीत चिमुकले रमले रंगांच्या दुनियेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Drawing Competition 2023

SAKAL Drawing Competition : गुलाबी थंडीत चिमुकले रमले रंगांच्या दुनियेत

जळगाव : रविवार (ता. २२)ची ‘सकाळ’ झाली ती गुलाबी थंडीत शालेय विद्यार्थ्यांना रंगांच्या विश्‍वात नेणारी. निमित्त होते ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या भव्य चित्रकला स्पर्धेचे. या राज्यव्यापी स्पर्धेनिमित्त जळगाव शहरातील सर्वच प्रमुख शाळांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्यातील कलाविष्कार साकारला.

या स्पर्धेदरम्यान महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर सीमा भोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील आदी मान्यवरांनी स्पर्धा केंद्रांना भेट देऊन बालगोपालांना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढविला. (Sakal Drawing Competition All School Children Participate happily in competition Jalgaon News)

हेही वाचा: Municipal Corporation News : महापालिकेच्या आयुक्तांबाबत आज निर्णय

‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे दरवर्षी बालचित्रकला स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित केली जाते. यंदाचे या स्पर्धेचे २१ वे वर्ष होते. या राज्यव्यापी स्पर्धेस जळगाव शहरासह जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. विविध चार गटांसह खुल्या गटासाठी यंदा प्रथमच ही स्पर्धा घेण्यात आली.

सकाळपासूनच उत्साह

माध्यमिक विभागातील दोन मोठ्या गटांसाठी सकाळी आठपासून या स्पर्धेस सुरवात झाली. नंतरच्या टप्प्यात लहान मुलांच्या दोन गटांत ही स्पर्धा झाली. खुल्या गटासाठी ती ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यासाठी सकाळपासूनच मोठा उत्साह दिसून येत होता. हाती पॅड, पेन्सील बॉक्ससह रंगांचे साहित्य, अशी जंत्री घेऊन मुले या कला महोत्सवात सहभागी झाली.

सेंट लॉरेन्स स्कूल भरगच्च

जळगाव शहरातील जवळपास सर्वच केंद्रांवर विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यातही पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. शाळेच्या विद्यार्थ्यांसह परिसरातील अन्य शाळांमधील मुलांनीही या केंद्रावर उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेतील प्राचार्य, शिक्षकांनी त्यासाठी चांगले सहकार्य केले.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Jalgaon News : ‘अलबत्या गलबत्या’ नाटक जळगावात

मान्यवरांनी वाढवला उत्साह

चित्रकला स्पर्धेदरम्यान विविध मान्यवरांनी केंद्रांना भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महापौर जयश्री महाजन व माजी महापौर सीमा भोळे यांनी प्रगती हायस्कूलच्या केंद्रावर जाऊन भेट दिली. स्पर्धेची माहिती जाणून घेत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तर उपमहापौर कुलभूषण पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केसीई सोसायटी संचालित ए. टी. झांबरे विद्यालयातील केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यांचे लाभले योगदान

प्रगती विद्यामंदिरात संस्थेचे अध्यक्ष पी. बी. ओसवाल यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव सचिन दुनाखे, मनीषा पाटील, श्रद्धा दुनाखे, शोभा फेगडे, विजया चवरे आदी विविध विभागांच्या मुख्याध्यापिका व शिक्षिका या वेळी उपस्थित होत्या. जे. के. स्कूलच्या ज्योती श्रीवास्तव, नोबेल विद्यालयाच्या अर्चना सूर्यवंशी, नंदिनीबाई विद्यालयाच्या चारुलता पाटील, बीयूएन रायसोनी स्कूलचे चंद्रशेखर पाटील, वंदना पवार, ए. टी. झांबरेच्या प्रणिता झांबरे, सतीश भोळे, श्री स्वामी समर्थ स्कूलच्या प्रगती पाटील, भगीरथ स्कूलचे एस. डी. भिरुड, चांदसरकर बालमोहन मराठी शाळेच्या सुरेखा चौधरी, आर. आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश जाधव, अरुण सपकाळे, श्रवण विकास मंदिराचे पद्माकर इंगळे, गिरीश बडगुजर, पुंडलिक गवळी, शिरसोली बारी समाज विद्यालयाचे सुनील ताडे, सिद्धिविनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश खोडपे व श्री. डांगरे, या. दे. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खंबायत, शंकर वाणी, आयडियल स्कूलचे प्राचार्य दीपक पाटील व श्रीकांत निकुंभ, सेंट लॉरेन्स स्कूलच्या प्राचार्या नेहा जास्मिन, वंदना चौधरी, सरला पाटील, अश्विनी महाजन, दिव्या पाटील, किरण शर्मा, पल्लवी नातू, हर्शाली चौधरी, कुसूम रायमा, रोझी जयस्वाल, पूजा परिहार, जयश्री ठाकूर, विलास पाटील आदींचे स्पर्धा आयोजनात महत्त्वाचे योगदान लाभले.

हेही वाचा: Crime News : 13 वर्षाच्या मुलाचा 6 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच डोक्यात घातली वीट

दिव्यांगाचा सहभाग

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित सावखेड्यातील श्रवण विकास मंदिरातील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या शाळेतील विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असले, तरी त्यांच्यात अनोखे कलागुण आहेत. विविध शोभिवंत वस्तू ते बनवीत असतात. त्यांच्या हातांनी रविवारी आकर्षक चित्रेही साकारली होती.

डोळ्यावर पट्टी बांधून काढले चित्र

स्पर्धेत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी वयाच्या मानाने अफलातून चित्रे काढल्याचे दिसून आले. आयडियल इंग्लिश स्कूल या सेंटरवर एका विद्यार्थ्याने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चित्र साकारले. त्याच्या या अनोख्या सहभागाबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत असून, त्याचे कौतुकही होत आहे.

हेही वाचा: Municipal Corporation News : महापालिकेच्या आयुक्तांबाबत आज निर्णय

या शाळांमध्ये भरला चित्रमेळा

जळगाव शहर व तालुक्यातील या. दे. पाटील विद्यालय, भगीरथ इंग्लिश स्कूल, आर. आर. विद्यालय, सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालय, ए. टी. झांबरे विद्यालय, गि. न. चांदसरकर बालमोहन मराठी शाळा, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, जे. के. इंग्लिश स्कूल, सेंट लॉरेन्स स्कूल, प्रगती व प्रोग्रेसिव्ह विद्यामंदिर, बीयूएन रायसोनी मराठी शाळा, श्रवण विकास मंदिर (सावखेडा), नोबल इंटरनॅशनल स्कूल, बारी समाज माध्यमिक विद्यालय (शिरसोली), आदर्श विद्यालय (कानळदा), न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (नशिराबाद), सार्वजनिक विद्यालय (आसोदा), अ. म. वारके विद्यालय (विदगाव), श्री स्वामी समर्थ विद्यालय (कुसुंबा), थेपडे माध्यमिक विद्यालय (म्हसावद) आदी शाळांच्या केंद्रांवर ही स्पर्धा झाली.

हेही वाचा: Crime News : 13 वर्षाच्या मुलाचा 6 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच डोक्यात घातली वीट