Brandedच्या नावाखाली नकली कपड्यांची विक्री; लाखोंचा मुद्देमाल जप्त

jeans
jeansesakal

जळगाव : ब्रॅण्डेड कंपन्यांच्या लोगोचा गैर वापर करुन वेगळ्याच कपड्यांवर ब्रॅण्डेड कंपन्यांचे लोगा लावून विक्री करणाऱ्या सेलवर संबधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांसह रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला. यात लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

ब्रँडेड कंपनीच्या लोगोखाली घबाड

शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसचे सभागृह भाडेतत्ववार घेवून मुळ दिल्लीतील व्यवसायिकाने सेल लावला आहे. या सेल मध्ये ब्रॅण्डेड कपड्यांची कमीदरात विक्री होत असल्याच्या जाहिराती करुन गर्दी खेचण्यात येत होती. शर्ट, टीशर्ट, जीन्स पॅन्ट, लेदर बेल्ट, परफ्यूम्स आणि सॉक्स यांचा समावेश आहे. तसेच, या ठिकाणी Levi’s या ब्रॅंडेड कंपनीचा लोगो लावून बनावट शर्ट, जीन्स पॅन्ट आणि सॉक्सची विक्री होत असल्याच्या शंकेतून लेविस कंपनीचे फिल्ड एक्झीक्यूटीव्ह ऑफिसर सचिन गोसावी आणि राकेश राम सावंत यांनी पाहणी केल्यावर कंपनीचा कुठलाही संबध या कपड्यांशी नसतांना त्याच्यावर लेविस कंपनीचा लोगो लावून चक्क सेल मध्ये विक्री होत असल्याचे आढळून आले. या प्रकारानंतर संबधीत अधिकाऱ्यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाडे, संजय सपकाळे, प्रविण जगदाळे यांच्या पथकाने छापेमारीकरुन माल ताब्यात घेतला आहे. उशिरा पर्यंत रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

jeans
स्‍कीमच्‍या नावाने फसवणूक; व्‍हॉट्‌सॲप हॅकच्या घटनांमध्ये वाढ
jeans
अबब! अचानक अकाउंटला आले लाख रुपये अन्...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com