Jalgaon Crime News : पिंप्री येथील सरपंच पतीस मारहाण; 24 जणांवर गुन्हा

Beating
Beatingesakal

Jalgaon Crime News : तालुक्यातील पिंप्री प्र. ऊ येथील सरपंचाच्या पतीसह घरातील नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी २४ जणांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ()

याबाबत सरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील यांनी फिर्याद दिली, की गुरुवारी (ता. २८) पिंप्री प्र. ऊ. येथे रामकृष्ण पाटील, मयूर पाटील यांना गावातील प्लॉट भागात राहणारे सुनील पगारे, रामभाऊ भिल, रणजीत भिल ,राजू भिल यांच्यासह २४ जणांनी एकत्र येऊन हातात लाठ्याकाठ्या, लोखंडी सळईने मारहाण केली.

Beating
Jalgaon Crime: कजगाव येथे सशस्त्र दरोडेखोरांची 10 लाखांची चोरी; मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

तसेच गावातील प्रमोद पाटील व त्यांचा मुलगा प्रेम पाटील यांना देखील मारहाण केली. तसेच ग्रामपंचायत सदस्यांसोबत लज्जास्पद कृत्य केले.

अशा आशयाच्या तक्रारीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे तपास करीत आहेत.

Beating
Jalgaon Crime News : भाई का ‘बड्डे’ अन्‌ चिंग्याचा राडा; जिल्हा कारागृहात कैद्याकडून यंत्रणा वेठीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com