जळगाव : कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या गावांत शाळा सुरू होणार

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत
School
SchoolSakal

जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. यातच राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार ज्या गावांमध्ये एकही बाधित रुग्ण नाही त्याच गावांमधील शाळांची घंटा सोमवारपासून (ता. २४) वाजणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

School
Uttarakhand Election : मंत्री रावत यांची काँग्रेसमध्ये वापसी

राज्यात कोरोनाची तीव्रता नियंत्रणात येत आहे. त्यामुळे वीस दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारी सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. परंतु स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून बालवाडी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचे अधिकारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यात शासनाने ज्या गावात रुग्णसंख्या कमी आहे, त्या गावातील शाळा सुरू करण्याचे नमूद केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ज्या गावात एकही बाधित रुग्ण नाही, त्याच गावातील शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढून सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

School
आरोग्य मंत्रालयाकडून १८ वर्षांच्या आतील मुलांसाठी दिशानिर्देश जारी

शहरातील शाळांना पाहावी लागणार वाट

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही शहरांमध्ये आहे. तसेच याठिकाणी ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरातील शाळा सुरू होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शहरी भागातील शाळा सुरू होण्यासाठी त्यांना रुग्णसंख्या कमी होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

हजार गावांमध्ये सुरू होणार शाळा

जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यातच सर्वाधिक रुग्ण हे शहरी भागात असल्याने शहराचा पॉझिटिव्ही रेटदेखील जास्त आहे. परंतु या तुलनेत जिल्ह्यात सुमारे हजार गावे हे कोरोनामुक्त असून याठिकाणी बाधित रुग्णसंख्या शून्य आहे. त्यामुळे या हजार गावातील शाळा पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com