शहरातून प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त; आयुक्तांची धडक कारवाई

Stocks of plastic were seized by the Municipal Anti Encroachment Squad.
Stocks of plastic were seized by the Municipal Anti Encroachment Squad.esakal

जळगाव : महापालिका आयुक्त विद्या गायकवाड (Municipal Commissioner Vidya Gaikwad) यांनी प्लॅस्टिक बंदी मोहीम धडकपणे राबविण्यास प्रारंभ केला आहे. आज त्यांनी दोन ठिकाणी कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक साठा जप्त (Seized) केला आहे. (Seized large stocks of plastic from city by JMC commissioner Jalgaon News)

शासनाने वीस मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर बंदी आणली आहे. त्यामुळे त्याचा साठा असणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांनी जळगाव शहरात प्लॅस्टिक बंदीची धडक मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील खानदेश मिल कॉम्पलेक्समधील रेखा एजन्सीच्या वर असलेल्या शुभगीत एन्टरप्रायजेसवर धाड टाकून प्रतिबंधित प्लॅस्टिक कापडाचा एक टन साठा जप्त केला. यापासून पिशव्यांचे बंद तयार करण्यात येत होते. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला.

Stocks of plastic were seized by the Municipal Anti Encroachment Squad.
Jalgaon : दिवसाआड अडीच कोटींच्या गुटख्याचे चरवण

नवरंग प्लॅस्टिकवर कारवाई

शहरातील नवरंग प्लॅस्टिक एमआयडीतील कारखान्यावर कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी ५१ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या तयार करीत असल्याचे आढळून आले, साधारणतः ७०० किलोपर्यंतचा माल जप्त करून ५००० रु दंड वसूल करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त (आरोग्य) अभिजित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार अतिक्रमण विभागप्रमुख संजय ठाकूर, प्लॅस्टिक बंदी पथक प्रमुख जितेंद्र किरंगे, अतिक्रमण विभागाचे मुकादम व कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

Stocks of plastic were seized by the Municipal Anti Encroachment Squad.
Jalgaon : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com