
Jalgaon : दिवसाआड अडीच कोटींच्या गुटख्याचे चरवण
जळगाव : अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) शहरातील नामांकीत ठिकाणी धडक कारवाई हाती घेतली आहे. गुटखामुक्त जिल्ह्यासाठी हे पाऊल स्वागतार्ह असले तरी केवळ लहान दुकानांवर कारवाई न करता दिवसाआड अडीच कोटींच्या गुटख्याचे (Gutkha) चरवण जिल्ह्यात होत असताना त्याचा ठोक बाजार करणाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. (Gutkha consum of worth Rs 2 half crore per day in Jalgaon news)
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनात सहाय्यक आयुक्त म्हणून संदीप पतंगे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी गुटखा विक्रीविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक मोठे गुटखा किंग राजरोस हा गोरखधंदा करतांय. जिल्ह्यात मध्यप्रदेश, मराठवाडा, विदर्भाचा सीमावर्ती भाग लागून आहे. जिल्ह्याचा उद्योग व्यवसाय मर्यादित होत असताना मात्र, अवैध धंद्यांसाठी याचा वापर होऊ लागला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू- सुपारीची कोट्यवधींची तस्करी अवैधमार्गाने जिल्ह्यात होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर धरणगाव तालुक्यातील पाळधी, जळगाव तालुक्यातील नशिराबाद, म्हसावद, जामनेर तालुक्यातील वाकोद, पहुरपेठ, मुक्ताईनगर तालुक्यात महामार्गालगतच्या गुदामांमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा माल उतरवला जातो.
पोलिसांची कठोर कारवाई
जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिसांनी पकडून कारवाईचा सपाटा लावत चोपडा, वरणगाव या ठिकाणी गुटख्याचे कंटेनर अडवून गुन्हे दाखल करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातही गुटख्याचा साठा महिन्यातच पकडण्यात आला. मात्र, कारवाईला जिल्ह्यातील काही लोकप्रतीनिधींनी नाराजी व्यक्त केली. तर, मागे चाळीसगाव तालुक्यात दोन लोकप्रतिनीधींचे एकमेकांशीच वाद झाले होते.
अन्न- औषध विभाग जायबंदी
जिल्ह्यात १५ तालुक्यांसाठी १ सहाय्यक आयुक्त अन् ३ अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) कार्यरत आहेत. कार्यालयात तब्बल ८ पदे रिक्त आहेत. शहरातील आंबेडकर मार्केटमधून अचानक पाचोरा, चाळीसगाव, भडगाव किंवा मुक्ताईनगर तालुक्याकडे कारवाईसाठी जावे लागले तर या अधिकाऱ्यांना साधे शासकीय वाहन देखील नाही. भाड्याची गाडी मागवून कारवाईला गेलेच तर.. त्याची बिले वर्षे-वर्ष मंजूर हेात नाही. जप्त माल ठेवण्यासाठी गुदाम नाही. कार्यालयात अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागाही नाही. कार्यालयातच जप्तमालाचा ढिगारा लावला असून गुटख्यावर कारवाई करणारे अधिकारी दिवसभर नाकातोंडाने या तंबाखूचा असाच नशा करण्यास मजबूर आहेत.
पान दुकानदार धास्तावले
गेल्या ८-१० दिवसांत शहरात नामांकीत पान दुकानांवर छापेमारी करण्यात आली. अटकेनंतर कोठडीनंतर कारागृह असा प्रवासही झाला. त्यानंतरही सिल केलेले दुकान उघडण्यासाठी त्यांना त्रास दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
हेही वाचा: Jalgaon : तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
कारवाईचा सपाटा...
वर्ष २०२१-२२ : ४ गुन्हे दाखल. १२ लाख ७४ हजार ६२ रुपयांचा माल जप्त
वर्ष २०२२-२३ : १० गुन्हे दाखल. २ कोटी २९ लाख४३ हजार ७२८ रुपयांचा माल जप्त.
हेही वाचा: Jalgaon : हेल्मेटधारी चोरट्यांनी वृद्धेची पोत लांबवली
"तुम्ही बदला नाही तर, माझी बदली करा. मला येण्यास अद्याप एक- दीड महिनाच झाला आहे. जिल्ह्याची पूर्ण माहितीही नाही. कुठल्याही दबावाला न जुमानता कारवाई होतच राहणार. मी जोपर्यंत येथे आहे तोपर्यंत प्रतिबंधित गुटख्याचा धंदा कोणी करु नये. अन् राजकीय दडपण आणण्याऐवजी माझी येथून बदली करवून आणावी. सुज्ञ नागरिकांनी मोठ्या गुटखा माफियांची माहिती दिली तर, त्यांच्यावर नक्की कठोर कारवाई होईलच."
- संदीप पतंगे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध विभाग
Web Title: Gutkha Consum Of Worth Rs 2 Half Crore Per Day In Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..