Amalner Marathi Sahitya Sammelan : संवादाचे प्रदेश खुले करणे हे आंतरभारतीचे काम : अमर हबीब

हबीब (अंबाजोगाई) म्हणाले की, आतापर्यंत वर्गीय व जातीय शोषणाचे संदर्भ दिले जातात ते झूठ आहेत.
 Amar Habib
Amar Habibesakal

Amalner Marathi Sahitya Sammelan : जेव्हा वाणी मूक होते तेव्हा संवादाचे प्रदेश खुले करणे, ह्रदय जोडणे आणि माणसाला माणसापासून विभक्त करणाऱ्या भिंती पाडणे हे आंतरभारतीचे काम आहे, असे विवेचन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी केले. ते ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर ‘आंतरभारती काल, आज, उद्या’ या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष किन्होळकर होते.

हबीब (अंबाजोगाई) म्हणाले की, आतापर्यंत वर्गीय व जातीय शोषणाचे संदर्भ दिले जातात ते झूठ आहेत. कुठल्याही जाती-धर्मात सर्जक असणाऱ्या स्त्रीचे व शेतकऱ्यांचेच अधिक शोषण झाले आहे. (Senior social activist Amar Habib opined that task of Bharat is to open up areas of dialogue jalgaon news)

स्त्री व शेतकरी यांना प्राधान्य देण्याच्या शिवराय-फुले-गांधी यांच्या परंपरेत साने गुरुजी येतात. सर्जक विरुद्ध शोषक हाच खरा संघर्ष असून तो आज अत्यंत अक्राळ-विक्राळ झाला आहे. मुलगी गर्भात मारतात आणि शेतकरी आत्महत्या करतोय. त्यांच्या वेदनेला शब्द देणे हेच आंतरभारतीचे काम असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

वाद हे भाषेबाबत नाहीत. माणसं माणसापासून विभक्त होत असताना भाषा काय म्हणून शिकू? इथे गांधीजींचा खून झाला त्याला वध म्हणणारेही आहेत. पोरं हातातून सुटत असल्याने आज जात व धर्म हे डायनॉसोर झाले आहेत. डॉ. अलका कुलकर्णी (शहादा) यांनी राज्या-राज्यातील भाषा शिकायची सोय व्हावी, हिंदी भाषा जाणणारे तज्ञ असावेत, विद्यार्थ्यांना अनेक भाषा शिकायला मिळाव्यात.

अनेक राज्यातले विद्यार्थी एकत्र रहावेत, चांगले वाचावे अशी साने गुरुजींची इच्छा होती. यासोबत मुलांना शेती, भारतीय कला, उद्योग, श्रम, सहकार आणि सहिष्णुता शिकावावी ही आंतरभारती स्थापनेमागे भूमिका होती, अशी मांडणी केली. चंद्रकांत भोंजाळ (अंधेरी) यांनी सगळा भेद संपावा, दुरावा घालवावा यासाठी आंतरभारतीची गरज व्यक्त केली. आज मराठीत केवळ बेस्टसेलर किंवा वादग्रस्त पुस्तकांचे अनुवाद होतात.

 Amar Habib
Jalgaon News : पाडळसरेचे काम 2025 पर्यंत पूर्ण होणारच : उपमुख्यमंत्री अजित पवार

दरवर्षी किमान पाच चांगल्या पुस्तकांची आदान-प्रदान व्हावी, असे धोरण आखले पाहिजे. हिंदी, इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे होतात पण मल्याळम लेखक काय म्हणतो हे कधी कळणार? हे मांडले. तसेच शरणकुमार लिंबाळे यांना मल्याळम साहित्यात मोठा मान असल्याची माहिती दिली.

जयेश म्हाळगी यांनी, आंतरभारतीच्या विचारांनी एकसंध भारत साध्य होईल. दोन राज्यात सुरू असलेली भांडणे, वाद शांत झाले असते. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हेच आंतरभारतीचे उद्दिष्ट होते, असे मत मांडले. संदीप घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.

ललित कला केंद्रातील घटनेचा निषेध

युवराज मोहिते यांनी सुरवातीलाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये सुरू असलेल्या नाटकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा संमेलनाच्या व्यासपीठावरून जाहीर निषेध केला. गांधी विचारांची रोज अशी हत्या केली जात आहे. तरीही निर्भय होऊन विचार मांडले पाहिजेत, असे परखड मत

मांडले. तसेच दक्षिणेने उत्तरेचे राजकरण थोपवले आहे. पुढे हा संघर्ष वाढणार आहे. बंगालीने पंजाबींना आणि हिंदूने मुसलमान हाकलले तर देशाचे काय होईल, असा प्रश्न साने गुरुजींनी विचारला होता. त्यांच्या आंतरभारतीच्या विचारातूनच संघर्ष थांबणार असल्याचे स्पष्ट केले.

 Amar Habib
Jalgaon News : ‘एलसीबी’च्या मनसबदारीसाठी मातब्बरांची फिल्डींग; पोलिस अधीक्षकांच्या बदलीनंतर हालचाली

एनआरसी कायद्यामुळे आसाम होरपळत आहे, सीमा भागात असंतोष आहे. पूर्वेकडच्या माणसांना आपण आपले मानतो का? साहित्यिक व्यासपीठांवर याची चर्चा झाली का? असे सवालही उपस्थित केले. सामन्यांना मुठीत बंद असलेला वेद सांगणारे ज्ञानोबा पहिले बंडखोर अनुवादक आहेत. तर महाभारत हे लेखकांच्या स्वातंत्र्याचे उदाहरण आहे.

व्यासांनी नियोग, पाच पती, कृष्णलीला सांगितल्या. साने गुरुजींनीही निर्भीडपणे लेखणी उचलून ‘आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान’ असे लिहिले. मात्र आज ते अर्बन नक्षल ठरले असते. पण जेलमध्येही ‘हाती घेऊ संविधान’ असंच लिहिलं असतं. अशा परखड शब्दांत त्यांनी बोटचेप्या लेखकांना फटकारले.

अनुवादातून कटुता संपावी

डॉ. किन्होळकर यांनी, साने गुरुजींची दृष्टी प्रांत, जात, भाषेत अडकली नाही. रंग, रूप, वेश नव्हे तर समस्त जगणं विस्तारत जावं ही त्यांची भूमिका होती. केवळ भाषा व अनुवाद एवढेच आंतरभारतीचे कार्य नाही. ती कलेचा पण आविष्कार करते.

आपसांतील वाद, वर्ग-वर्ण संघर्ष मिटेल त्याचदिवशी यश मिळालं म्हणता येईल. साहित्य अनुवादातून कटुता संपायला हवी, प्रांतवादाचा तिरस्कार संपावा, भारतीय सहिष्णुता वाढावी तेव्हा आपण सृजन नागरिक बनू, असे विश्लेषण त्यांनी केले.

 Amar Habib
Jalgaon News : ‘आपला दवाखाना’ उपक्रम डॉक्टराविना कुलूपबंद; ‘एमबीबीएस’ डॉक्टर मिळेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com