Jalgaon News : विद्रोही साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे

अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक, सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड करण्यात आली
Dr. Vasudev Mulate
Dr. Vasudev Mulateesakal

अमळनेर : येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक, सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड करण्यात आली आहे.

अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी यांनी दिली. (Senior writer critic Dr Vasudev Mulate appoints President of vidrohi Marathi Sahitya Sammelan jalgaon news)

संभाजीनगर येथील महात्मा गांधी भवनात झालेल्या बैठकीत डॉ. मुलाटे यांची निवड घोषित करण्यात आली.

शेतकरी, कष्टकरी, वंचित, दलित समूहाची दुःखे, लोकजीवनातील शोषण, उपासमार आणि सर्व बाजूंनी झालेली कोंडी मुलाटे यांच्या साहित्यातून समर्थपणे प्रकट झालेली असून, मुलाटे यांच्या लेखनातून फक्त ग्रामीण भागातीलच नाही तर ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित झालेल्यांचेही दुःख उजागर झाले आहे.

गावकुसातील व गावकुसाबाहेरील पूर्वास्पृश्य आणि डोंगरदऱ्यातील आदिवासी असा ज्या चळवळीने ग्रामीण शब्दाला व्यापक अर्थ दिला. या चळवळीचे सारथ्य मुलाटे यांनी केले आहे.

ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. प्रस्थापितांच्या आमिषाला बळी न पडता त्यांनी सातत्याने परिवर्तनवादी, विद्रोही लेखन केले आहे.

Dr. Vasudev Mulate
Jalgaon News : रिक्त जागा भरून घेण्यासाठी लवकरच ‘स्पॉट राउंड'; ‘आयुष’ सकारात्मक

डॉ. वासुदेव मुलाटे यांनी अध्ययन, अध्यापन, संशोधन, समीक्षा आणि प्रकाशनाच्या माध्यमातून मराठी साहित्याच्या केलेल्या सेवेची दखल म्हणून ही निवड केल्याचे प्रा.परदेशी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रा. परदेशी,संघटक सत्यशोधक किशोर ढमाले, प्रा. डॉ. अशोक चोपडे (वर्धा), अर्जुन बागूल (नाशिक), अमळनेर विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी प्रा. डॉ. माणिक बागले.

मन्साराम पवार, लाजरस गावीत (धुळे), आमीन शेख, यशवंत बागूल, डॉ. मारोती कसाब, डॉ. व्यंकट सूर्यवंशी, दत्ताभाऊ खंकरे, अंकुश सिंदगीकर (उदगीर), प्रा. विलास बुआ , प्रा. भारत सिरसाठ, अनंत भवरे, चित्रकार राजानंद सुरडकर.

आर. टी. गावीत, कपिल थुटे, राजेंद्र कळसाईत, अश्पाक कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Dr. Vasudev Mulate
Jalgaon News : तोंडापूर परिसरात वृक्षांची अवैध कत्तल! खानदेश मराठवाडा सीमेवर जंगल दुर्लक्षित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com