Jalgaon GMC News : अबब..! महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा

Jalgaon GMC News : अबब..! महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा
esakal
Updated on

Jalgaon News : पोटामध्ये असलेल्या मोठ्या गोळ्यामुळे जीवन जगणे कठीण झालेल्या महिलेला जिवंतपणे होत असलेल्या त्रासातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) शल्यचिकित्सा विभागातील वैद्यकीय पथकाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून मुक्त केले.

विशेष म्हणजे महिलेची लहानपणी हृदयशस्त्रक्रिया झाली होती. ही जोखीम पत्करूनही वैद्यकीय पथकाने कौशल्य पणाला लावले आणि महिलेला दिलासा दिला. (seven and half kg lump was removed from woman stomach by GMC hospital jalgaon news)

महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभागप्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ३१) रुग्णालयातून निरोप देण्यात आला. गोद्री (ता. जामनेर) येथील दीपाली गोपाळ यांच्यावर लहानपणी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वर्षभरापासून त्यांच्या पोटात सारखे दुखत होते.

नंतर पोटामध्ये गोळा असल्याचे निदान झाले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दीपाली यांच्यासह कुटुंबीयांनी शस्त्रक्रिया करण्याची अपेक्षा सोडून दिली होती. त्यातच त्यांच्या गावात मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर लागले. शिबिरात शल्यचिकित्सा विभागाने तपासणी करून त्यांना तत्काळ ‘जीएमसी’त येण्यास सांगितले.

तेथे शस्त्रक्रिया होईल, खर्चदेखील लागणार नाही, याची हमी घेण्यात आली. त्यामुळे दीपाली दाखल झाल्या. तपासणीनंतर त्यांच्या पोटात आतड्याची गाठ असल्याचे निदान झाले. शल्यचिकित्सा विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत देवरे यांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon GMC News : अबब..! महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा
Jalgaon News : दिराने केला वहिनीसह दोघा मुलांचा स्वीकार! मराठा समाजातील आदर्श विवाह..

शस्त्रक्रियेनंतर दीपाली गोपाळ हिच्या पोटातून साडेसात किलोचा गोळा काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया वैद्यकीय पथकाने यशस्वी केली. वर्षभरापासून गाठ असल्यामुळे शरीरातील इतर अवयव दाबले गेले होते. तसेच हृदयाच्या दुर्धर आजाराची आधीच शस्त्रक्रिया झालेली असल्याने कमी वेळेत, कमीत कमी रक्तस्त्राव होईल, अशा पद्धतीने ही शस्त्रक्रिया करायची होती, ती यशस्वी झाली.

शल्यचिकित्सा विभागप्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. ईश्‍वरी गारसे, डॉ. विपिन खडसे, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. जिया उल हक, भूलशास्त्र विभागाचे डॉ. संदीप पाटील, डॉ. ऋतुराज काकड, इन्चार्ज परिचारिका नीला जोशी यांच्या पथकाने या वेळी सहकार्य केले.

Jalgaon GMC News : अबब..! महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा
Jalgaon Crime News : जळगावात भरदिवसा स्टेट बँकेत दरोडा; कोटीचे सोने घेत दोघे पसार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com