Jalgaon News : ‘अमृत’चा मक्ता मुंबईच्या शहा एजन्सीला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हटविण्याप्रकरणी निषेध

Shah Technical Agency of Mumbai was given majority approval of consultant for Amrit 2 0 Water Supply and Sewerage Scheme jalgaon news
Shah Technical Agency of Mumbai was given majority approval of consultant for Amrit 2 0 Water Supply and Sewerage Scheme jalgaon newsesakal

जळगाव : शहरात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत २.०’ (Amrit 2.0) पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेसाठी सल्लागार नियुक्ती करण्यावर महापालिकेच्या महासभेत दोन तास काथ्याकूट झाल्यानंतर अखेर मुंबईच्या शहा टेक्निकल एजन्सीला देण्यावर बहुमताने मान्यता देण्यात आली. (Shah Technical Agency of Mumbai was given majority approval of consultant for Amrit 2 0 Water Supply and Sewerage Scheme jalgaon news)

घनकचरा प्रकल्पाच्या मान्यतेसाठी विधी विभागाच्या अहवाल आल्यानंतर पुढील सभेत विचार करण्याचा निर्णय झाला. जिल्हा रुग्णालयासमोरील जागेतील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पुतळा हलविला होता.

याप्रकरणी आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करीत भारतीय जनता पक्षाचे सुरेश सोनवणे यांनी सभात्याग केला. अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या बोगस नळकनेक्शन जमा पावत्यांची चौकशी करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला.

सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी (ता. २१) महापालिकेची महासभा झाली. पीठासीन अध्यक्षपदी महापौर जयश्री महाजन होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगसेवक विशाल त्रिपाठी, इब्राहीम पटेल, ॲड. शुचिता हाडा यांनी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

‘अमृत २.०’ सल्लागार नियुक्ती

महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत २.०’ पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेसाठी सल्लागार समिती नियुक्तीचा पेच सुटला. मुंबई येथील शहा टेक्निकल कंपनीच्या सर्वांत कमी रकमेची निविदेला मान्यता देण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. मात्र, ॲड. शुचिता हाडा यांनी या प्रस्तावाला विरोध केला.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

Shah Technical Agency of Mumbai was given majority approval of consultant for Amrit 2 0 Water Supply and Sewerage Scheme jalgaon news
Gudi Padwa 2023 Gold Rate: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीला पुन्हा झळाळी; जाणून घ्या दरवाढ..

घनकचरा प्रकल्प विधी शाखेकडे

महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पासाठी मक्तेदाराला मान्यता देण्याचा प्रस्ताव विधी शाखेकडे पाठविण्याचा निर्णय सर्वांनी मंजूर केला. त्यांचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. ॲड. शुचिता हाडा, नितीन लढ्ढा, विशाल त्रिपाठी, उपमहापौर कुलभूषण पाटील, जितेंद्र मराठे, ॲड. दिलीप पोकळे आदींनी यावर चर्चा केली.

डॉ. आंबेडकर पुतळ्याप्रकरणी निषेध

जिल्हा रुग्णालयासमोरील जागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलविण्याचा, तसेच महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध भाजपचे नगरसेवक सुरेश सोनवणे यांनी केला.

याप्रकरणी आयुक्तांनी आपले म्हणणे सादर करताना नगरसेवकांना विचारात घ्यावयास हवे होते, असे मत नगरसेवक सोनवणे यांनी व्यक्त केले. याबाबत नगरसेवक नितीन लढ्ढा व सभागृहानेही पुतळा हलविण्याच्या प्रकाराचा निषेध केला. नंतर नगरसेवक सुरेश सोनवणे यांनी सभात्याग केला.

नळकनेक्शनच्या बोगस पावत्या

नळकनेक्शनसाठी नागरिकांना बोगस पावत्या दिल्या जात असल्याचा मुद्या नगरसेवक गायत्री शिंदे यानी उपस्थित केला. त्यांनी सांगितले, की राजेंद्र सोनार यांनी आपल्या प्रभागातील व्यक्तीकडून नळकनेक्शन देण्यासाठी रक्कम घेतली व त्याला बोगस पावती दिली. मात्र, नळकनेक्शन दिलेच नाही.

Shah Technical Agency of Mumbai was given majority approval of consultant for Amrit 2 0 Water Supply and Sewerage Scheme jalgaon news
Jalgaon News : वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी जळगावात होणार केंद्र; जागतिक वनदिनी शासनाची भेट!

याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावेळी नगरसेवक नितीन लढ्ढा, इब्राहीम पटेल, नवनाथ दारकुंडे, जितेंद्र मराठे, उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. याप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानुसार महापौरांनी याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, असे आदेश दिले.

घनकचरा प्रकल्पाचा रस्ता करा अन्यथा....

महापालिकेच्या आव्हाणे भागातील घनकचरा प्रकल्पासाठी चंदू अण्णानगर भागातून जाणार रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तो रस्ता त्वरित दुरुस्त करावा, यासाठी आपण अनेकवेळा मागणी केली आहे. मात्र, अद्यापही त्याकडे लक्ष दिलेले नाही.

येत्या आठ दिवसांत काम सुरू झाले नाही, तर आपण रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, असा इशारा नगरसेवक मनोज चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिला. त्यावर आयुक्तांनी हा रस्ता महापालिका फंडातून करण्याबाबत आदेश दिले.

११८७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन

महापालिकेतील लेखा परीक्षेत आक्षेप असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्‍न सभागृह नेते नितीन लढ्ढा व इतर सदस्यांनी उपस्थित केला. याबाबत मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत वानखेडे म्हणाले, की लेखा परीक्षणात आक्षेप असलेल्या सर्व ११८७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासनाला अहवाल सादर करण्याचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. तो लवकरच सादर करून आक्षेप असलेल्या सर्व ११८७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Shah Technical Agency of Mumbai was given majority approval of consultant for Amrit 2 0 Water Supply and Sewerage Scheme jalgaon news
Jalgaon Budget 2023 : जळगाव महापालिकेचे 886 कोटींचे अंदाजपत्रक सादर; नागरिकावर करवाढ नाही!

शौचालय पाडणार नाहीत

शिवाजीनगरातील सार्वजनिक शौचालय पाडण्याबाबत आदेश दिल्याचा मुद्या नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी उपस्थित केला, तो आदेश मागे घ्यावा. नागरिकांमध्ये तीव्र संताप असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी सांगितले, की तेथील नगरसेवकांना विचारात घेतल्याशिवाय त्या भागातील शौचालय पाडण्यात येणार नाहीत. तो आदेश आपण मागे घेत आहोत.

रस्त्याची गुणवत्ता, विरोधी पक्षनेते हरविले

शहरातील रस्ते कामाच्या गुणवत्तेबाबत भाजपचे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, की शहरातील काही रस्त्यांचे कामे झाली आहेत. मात्र, सहा महिन्यांत हे रस्ते खराब झाले आहेत. त्याच्या गुणवत्तेबाबत विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची गरज आहे. मात्र, तेच हरविलेले आहेत.

याबाबत त्यांनी महासभेत हातात सुनील महाजन यांचे छायाचित्र असलेला फलकही घेतला होता. त्यावर महाजन यांनी आक्षेप घेत सत्ताधारी चांगले काम करीत आहेत. आपण प्रसिद्धीसाठी हे करू नये, असेही श्री. मराठे यांना सांगितले. मात्र, शहरातील रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे आदेश महापौरांनी दिले, तर अमृत योजनेच्या मक्तेदारास पाचारण करून काम कधी पूर्ण करणार याबाबत विचारणा करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

Shah Technical Agency of Mumbai was given majority approval of consultant for Amrit 2 0 Water Supply and Sewerage Scheme jalgaon news
Jalgaon News : जिल्ह्यात खाकीचे कोम्बिंग ऑपरेशन; बेशिस्त वाहनचालकांना दंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com