Bjp and shivsena
Bjp and shivsenaesakal

Shivsena Shinde Group : शिवसेना शिंदे गटाचा जळगाव लोकसभेसाठी आग्रह : नीलेश पाटील

Shivsena Shinde Group : राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाची युती आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीत जळगाव लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटासाठी भाजपने सोडावी, अशी मागणी करण्यात आली असून, त्याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांना अहवाल सादर करण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी दिली. (Shiv Sena demanded to BJP to leave Jalgaon Lok Sabha seats for Shiv Sena Shinde group jalgaon news)

याबाबत श्री. पाटील यांनी सांगितले, की लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे राज्यात युतीतर्फे लोकसभेच्या निवडणुका लढविण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील मतदारसंघांची माहिती पक्षातर्फे घेण्यात येत आहे. यात जळगाव लोकसभा मतदारसंघ शिंदे गटातर्फे लढविण्याची तयारी सुरू आहे.

त्यादृष्टीने वरिष्ठांनी अहवाल मागितला होता. तो आपण खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सादर केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bjp and shivsena
Eknath Shinde: अंबादास दानवे चक्क CM शिंदेंच्या भेटीला! काय घडलं नेमकं वाचा सविस्तर

त्यात प्रामुख्याने जळगाव लोकसभेमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत व भाजपचे दोन आमदार आहेत आणि एक अमळनेरचे महायुतीतील सहयोगी आमदार अनिल भाईदास पाटील आहेत. शिवसेनेचे खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे, म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेतल्यास निश्चित यश मिळणार आहे, असेही आपण अहवालात मांडले आहे.

याशिवाय आपण जिल्हाप्रमुख म्हणून जिल्ह्यात केलेल्या आंदोलनांचा. तसेच शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या कामांचा अहवालही आपण खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Bjp and shivsena
Shinde Group: नाशिककरांवर लादलेली अवाजवी घरपट्टी रद्द; शिवसेनेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com